pmpml sakal
पुणे

पुणे : भरलेल्या बसमध्ये अंतर राखायचे कसे?

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फेऱ्या वाढविण्याची मागणी

जितेंद्र मैड

कोथरुड : कोरोना (Corona) अजून संपलेला नाही, असे सांगत ‘अंतर राखा’ असा उपदेश केला जातो, परंतु प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये (Pmpml bus) सोशल डिस्टन्स कसा राखायचा, याचे प्रात्यक्षिक उपदेश करणाऱ्यांनी दाखवावे, अशी मागणी क्षितीजा होले या युवतीने संतापाने केली. (How to keep distance full Pmpml bus pune)

एसएनडीटीच्या (SNDT) थांब्यावरुन चिंचवड (chinchawad) गावकडे निघालेल्या क्षितीजाला प्रवाशांच्या गर्दीमुळे बसमध्ये चढता आले नाही. वेळेवर कार्यालयात पोहचता येणार नसल्याने चिडचीड करण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. लॉकडाउनचे (Lockdown) निर्बंध शिथिल झाल्यानंतर लोक कामाधंद्याच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत, परंतु रिक्षा वा खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नाही. बसचा प्रवास किफायतशीर वाटला तरी वेळखाऊ आहे.

बसची संख्या कमी असल्याने, फेऱ्या कमी होत असल्याने गर्दीमध्ये प्रवास करावा लागत आहे. बस चुकल्यामुळे कामाला उशीरा पोहचत असल्याचा त्रास नोकरदारांना होत आहे. कोथरूडवरून पुणे स्टेशन, मार्केट यार्ड, लोहगाव, पौड, निगडी या मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना फेऱ्या मात्र कमी असल्यामुळे प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

बसच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. लॉकडाउन आहे असे सांगत असले तरी रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नाही. लोकांना कामाच्या निमित्ताने प्रवास करावाच लागतो. पेट्रोलबरोबरच सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणे परवडत नाही. वेळेत कामावर गेले नाही तर कामावरुन काढून टाकले जाण्याची भिती वाटते.

- शारदा कदम, प्रवासी

लॉकडाउन आणि कोरोना कधी संपेल माहिती नाही, परंतु बसमध्ये लावलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या व स्टँड मात्र गायब झाली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायाविषयी पीएमपी किती गंभीर आहे, हे लक्षात येते.

- संतोष डोख, जयभवानीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

Kokan: कोकणात महायुतीत बंडखोरी, शिवसेना आमदाराच्या लेकीचा अर्ज; तटकरेंच नाव घेत थेट सुनावलं

SCROLL FOR NEXT