emergancy pass 
पुणे

नागरिकांनो, सावधान ! असेच वागत राहिलात तर पास रद्द होतील अन्...

सकाळवृत्तसेवा

वाघोली (पुणे) : वाघोली ग्रीन झोनकडे जात आहे. मात्र, शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी व विक्रेते यांचा बेजबाबदारपणा महागात पडू शकतो. आव्हाळवाडी फाट्यावर सकाळी आठच्या सुमारास शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी होते. त्यामुळे सामाजिक अंतराचा पूर्ण फज्जा उडतो. दरम्यान बेजबाबदारपणा करणाऱ्यांचे अत्यावश्‍यक सेवेचे पास रद्द केले जातील. असा इशारा पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिला आहे. 

सध्या वाघोलीत चार रुग्ण आहेत. मागील दहा दिवसापासून एकाही रुग्णाची वाढ झालेली नाही. 16 एप्रिलपासून किराणा दुकाने, भाजीपाला विक्री बंद आहे. केवळ घरपोच सेवा सुरू आहे. पोलिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी दिवस- रात्र एक करून काळजी घेत आहेत. मात्र, अनेक भाजी विक्रेते अंतर्गत रस्त्यावर विक्री करतात. विक्रेत्यांची संख्याही खूप वाढली आहे.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अनेक शेतकरी वाहनामध्ये भाजीपाला घेऊन आव्हाळवाडी फाट्यावर थांबतात. त्यामुळे विक्रेते तो माल खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. काही नागरिकही खरेदीसाठी येतात. सामाजिक अंतराचा फज्जा तर उडतोच शिवाय काहीजण मास्कही वापरत नाहीत. पोलिस आले की पळून जातात. हे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या सर्वांचा बेजबाबदारपणा वाघोलीकरांना महागात पडू शकतो. सध्या आपण ग्रीन झोन कडे जात आहे. आपला बेजबाबदारपणा चूक घडवू शकतो याचा विचार प्रत्येक नागरिकाने करायला हवा. एक भाजी विक्रेता कोरोना बाधित झाल्याची अफवाही तीन चार दिवसांपूर्वी पसरली होती. आम्ही घरीच राहू कोरोनाला रोखू अन ग्रीन झोन मध्ये जाऊ अशी प्रतिज्ञाच प्रत्येक वाघोलीकराने करायला हवी. 

वाघोली परिसर सील केलेला आहे. किराणा व भाजीपाला विक्रेत्यांना घरपोच सेवा देण्यास सांगितले आहे. मात्र, काही जण बेजबाबदारपणे वागत असल्याचे समजते. मात्र त्यांची गय केली जाणार नाही. अत्यावश्‍यक सेवेचे पास तर रद्द होतीलच शिवाय गुन्हाही दाखल होईल. 
- प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक, लोणी कंद पोलिस ठाणे. 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तेथे थांबवून असा प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ. 
- महादेव चव्हाण, ग्रामविकास अधिकारी, वाघोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT