पुणे

प्रस्थानसाठी वारकऱ्यांची संख्या वाढवावी; विभागीय आयुक्तांकडे मागणी

- गजेंद्र बडे

पुणे/आळंदी : आषाढी वारी सोहळ्यातील प्रस्थान वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची संख्या वाढवून द्यावी, अशी एकमुखी मागणी आळंदी, देहू देवस्थानसह विविध देवस्थानचे प्रमुख आणि वारकऱ्यांनी शुक्रवारी (ता.१८) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. राज्य सरकारने आषाढी वारीस दिलेल्या यापूर्वीच्या निर्देशास सर्व संतांच्या देवस्थानांनी आज एकमुखी सहमती दर्शविली. वारकऱ्यांच्यावतीने देवस्थानांनी केलेल्या या मागणीबाबत राज्य सरकारशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन विभागीय आयुक्त राव यांनी यावेळी वारकऱ्यांना दिले.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव आणि संत चांगा वटेश्वर या चार मानाच्या पालखी प्रस्थान व पंढरपूरला जाण्यासाठीच्या सोहळ्याच्या नियोजनाबाबत आज विभागीय आयुक्त राव यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, डॉ. अभय टिळक, ॲड. विकास ढगे, योगेश देसाई, नितीन मोरे, संजय मोरे, भानुदास मोरे, माणिक मोरे, बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, राणा महाराज वासकर, भाऊ महाराज गोसावी, मारुती कोकाटे, चैतन्य लोंढे, त्रिगुण गोसावी आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणेच यंदाही राज्यातील दहा प्रमुख संतांच्या पालख्या राज्य परिवहन मंडळाच्या गाडीने आषाढी वारीसाठी जाणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानसाठी शंभर वारकऱ्यांच्या उपस्थितीस परवानगी दिली आहे. यामध्ये आळंदी देवस्थानच्यावतीने प्रस्थानाच्या कार्यक्रमासाठी वारक-यांची संख्या देवस्थानच्या दिंड्यांच्या प्रमाणात वाढवून मिळावी. यानुसार किमान पाचशे वारकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी केली.

वारकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

- प्रस्थान सोहळ्यासाठी दिंड्यांच्या तुलनेत ५०० वारकऱ्यांना परवानगी द्यावी

- प्रस्थान सोहळ्यासाठी आणि उभे रिंगण सोहळ्यासाठी मानाच्या अश्वांना

परवानगी द्यावी

- पंढरपूर नगरप्रदक्षिणासाठी परवानगी मिळावी

- श्री विठ्ठल दर्शनासह, प्रदक्षिणा,गोपाल काला सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांना संधी

मिळावी

- सोहळ्यास दीड किलोमिटरऐवजी किमान ईसबावीपासून पायी जाण्यास परवानगी द्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT