esakal | Corona: पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Murlidhar MOHOl

Corona: पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून राहणार बंद

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनलॉक झालेल्या पुण्यात लोक आता नेहमीप्रमाणेच गर्दी करत असल्याचं चित्र आहे. गेल्या सोमवारी पहिल्याच दिवशी अनेक पुणेकरांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये हजेरी लावली. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर सोमवारपासून ५० टक्के क्षमतेने मॉल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश मॉल सोमवारी खुले झाले आहेत.

मात्र, नागरिक पुन्हा घराबाहेर पडत असल्याचं चित्र आहे. नागरिकांनी नेहमीप्रमाणे निष्काळजीपणा दाखवला तर तो तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरु शकतो. या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाचा निर्णय आज जाहीर केला आहे.

हेही वाचा: साडी नेसून पुश-अप; पुण्यातल्या महिला डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल

शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार ! पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यातील कोरोनाची आजची आकडेवारी

पुणे शहरात आज नव्याने २८० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७५ हजार ३७७ इतकी झाली आहे. शहरातील ३१८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६४ हजार २०३ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ५ हजार ९५१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २६ लाख ०४ हजार ६८८ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ६५८ रुग्णांपैकी ४०९ रुग्ण गंभीर तर ६११ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ५१६ इतकी झाली आहे.

loading image
go to top