Pune_Rain 
पुणे

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात रविवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर उर्वरित भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी पडल्या. तसेच कोकण, गोवा आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान येत्या गुरुवार पर्यंत (ता.२०) मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

अरबी समुद्रातून वाहणारे वारे उत्तर-पश्चिम दिशेने येत असून यामध्ये काही प्रमाणात आर्द्रता असल्याने मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागांमध्ये सोमवारी (ता.१७) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील चार दिवस कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने नमूद केले. रविवारी राज्यात २२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

पुणे जिल्ह्यातील घाट विभागात 'ऑरेंज अलर्ट'
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहर आणि परिसरात सोमवार नंतर दोन दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर शनिवारपर्यंत (ता.२२) शहर आणि परिसरात पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. 

रविवारी शहर व परिसरात मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आणि घाटांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण कायम होते. तसेच शिवाजीनगर येथे ०.६ मिलिमीटर आणि लोहगाव येथे ०.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारत-पाकिस्तान १६ वर्षांनी आमने-सामने! दोन्ही संघांसाठी 'करो वा मरो' सामना, कुठे अन् कधी पाहाणार?

Ambajogai News : धानोरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने संपविले जीवन; मुलींची छेड काढल्याच्या संशयातून झाली होती मारहाण

Yogi Adityanath यांच्याकडून नाना पाटेकरांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, 'प्रसिद्धी न करता शेतकऱ्यांसाठी मदत करणारी पहिली व्यक्ती...'

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

SCROLL FOR NEXT