haldi.jpg 
पुणे

'तो' हळदीनिमित्त आला... त्याने 60 जणांना प्रसाद दिला अन्...

डी. के वळसे-पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे आलेल्या कोरोना बाधित रुग्णाने हळदीच्या निमित्ताने आलेल्या साठ जणांना प्रसाद दिला आहे. त्यामध्ये बांगड्या भरण्यासाठी आलेला कासार मामा व फोटोग्राफरचा समावेश आहे. संबंधित रूग्ण मुंबईहून गावी आले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुतणीच्या लग्नाची तयारी करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वीच हळदीचा कार्यक्रम झाला. संबंधित रुग्णाला लक्षणे दिसू लागल्यामुळे त्याला प्रथम मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले यांची चौकशी आरोग्य विभाग व प्रशासनाने सुरू केली आहे. संबंधिताचे घर एकांतात आहे. पण हळदीच्या कार्यक्रमात रुग्ण सहभागी झाला होता. 55 जणांना स्वतःच्या घरातच होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.

पाच जणांना वडगाव काशिंबेग येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले  आहे. जवळे गावातील आढळलेल्या रुग्णाच्या दोन नातेवाईकांना भीमाशंकरच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवले आहे. आंबेगाव तालुक्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. त्यामुळे प्रशासन व गावकरी काळजीत पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

जमिनीतून गूढ आवाज अन् भूकंपाचे धक्के; नागरिकांनी थेट घराबाहेर घेतली धाव, हिंगोलीतील प्रकार

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT