‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’ औषधाचा वापर कोणासाठी?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 मे 2020

भारतात कोरोनाचा गंभीर धोका असलेले रूग्ण आणि कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या गोळ्यांचा वापर करावा असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. या संस्थेच्या कृती गटाने जारी केलेल्या ताज्या दिशा निर्देशांत या सूचनांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा गंभीर धोका असलेले रूग्ण आणि कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या गोळ्यांचा वापर करावा असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. या संस्थेच्या कृती गटाने जारी केलेल्या ताज्या दिशा निर्देशांत या सूचनांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून या गोळ्यांची सर्वत्र  चर्चा होती. अमेरिकेच्या अन्न आणि प्रशासन विभागाने या गोळ्यांच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब केले होते. भारतात या गोळ्यांचे जगाच्या तुलनेत ७० टक्के उत्पादन होते हे लक्षात घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, या गोळ्या भारताने अमेरिकेला द्याव्यात, अन्यथा गंभीर परिणाम होतील अशी धमकीच  दिली होती. त्यानंतर भारताने तात्काळ निर्यातीवरील निर्बंध मागे घेऊन अमेरिकेसह सुमारे ६० देशांना या गोळ्यांचा पुरवठा केला होता. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरते असे भारताने  अधिकृतरीत्या म्हटलेले नाही.

कोरोनाचे थैमान सुरुच; 144 नवे रुग्ण आढळले

लहान मुलांना औषध नको
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना या औषधाच्या गोळ्या उपचार म्हणून द्याव्यात असे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. प्रयोगशाळांकडून ज्या संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या गोळ्यांचा डोस द्यावा.  पंधरा वर्षांच्या आतील मुलांना मात्र या गोळ्या देऊ नयेत असे या निर्देशांत नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For whom use the drug hydroxychloroquine