khed-shivapur toll naka Sakal
पुणे

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाका बंद होणार नाही

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : "पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाका हा बंद होणार नाही तर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा टोलनाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रिलायन्स इन्फ्राकडून स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. म्हणजेच या कालावधीत कंत्राटदाराला टोलचे पैसे मिळणार नाहीत," असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

पुणे येथे शुक्रवारी (ता.24) झालेल्या कार्यक्रमात पुणे-सातारा रस्त्यावरील टोल बंद (टर्मिनेट) करण्यात आला आहे, अशी माहिती केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. त्यामुळे नक्की टोल बंद होणार म्हणजे काय? कधीपासून टोल बंद होणार? याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. यावर स्पष्टीकरण देताना टोल नाका बंद होणार नसून तो' एनएचएआय'कडे हस्तांतरीत होणार असल्याचे चिटणीस यांनी सांगितले.

चिटणीस म्हणाले, "टोल बंद (टर्मिनेट) होणार याचा अर्थ पुणे-सातारा रस्त्यावरील टोल बंद होणार नाही. तर खेड-शिवापूर टोलनाका काही काळासाठी रिलायन्स इन्फ्राकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. म्हणजेच हा टोल नाका स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. या कालावधीत कंत्राटदाराला म्हणजेच रिलायन्स इन्फ्राला टोलचे पैसे मिळणार नाहीत. पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाका 'एनएचएआय'च्या ताब्यात असणार आहे."

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टोलनाका रिलायन्स इन्फ्राकडे देण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कामासाठी खर्च झालेली रक्कम रिलायन्स इन्फ्राकडून वसूल करण्यात येईल. टोलनाका 'एनएचएआय'कडे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही चिटणीस यांनी सांगितले.

याबाबत खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर म्हणाले, "एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांच्या टोल बंदच्या स्पष्टीकरणावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टोल बंदची घोषणा चोवीस तासाच्या आत हवेत विरल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार म्हणजे एनएचएआय' रिलायन्स इन्फ्राला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती टोल हटाव आंदोलनासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT