सोलापूर : वाळू तस्करानं पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं; जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sand thief

सोलापूर : वाळू तस्करानं पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं; जागीच मृत्यू

सोलापूर : वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे घडला आहे. या घटनेत या पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. वाळू माफियांवर अशा कारवाईसाठी गेलेल्या प्रशासकीय कर्मचारी आणि पोलिसांवर वारंवार असे हल्ले घडले आहेत, त्याची आज पुनरावृत्ती झाली.

हेही वाचा: मुंबईत एक दिवासाआड शाळा? अशी असणार व्यवस्था

गणेश सोनलकर असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंगळवेढ्यातील गोणेवाडी येथे वाळू चोरी सुरु असल्याची खबर त्यांना मिळली होती. त्यानुसार, कारवाईसाठी गेल्यानंतर घटनास्थळी मुजोर वाळू तस्करांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली, या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: भारतातील लसीकरण एक अब्जच्या दिशेने; गाठला 85 कोटींचा टप्पा

सोलापूर जिल्ह्यात अद्याप वाळूचे कुठलेही लिलाव झालेले नाहीत. त्यामुळं रोजचं येथील भीमा नदीच्या पात्रात राजरोसपणे बेकायदा पद्धतीनं वाळू उपसा सुरु असतो. पोलीस, महसूल कर्मचारी यांच्या अंगावर थेट गाडी घालण्याची त्यांची नेहमीची पद्धत बनली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाल्याची माहिती नाही. याचा तपास सुरु असल्याचे सूत्रांकडून कळते.

loading image
go to top