voting
voting 
पुणे

Loksabha 2019 : कमी मतदानामुळे पुणेकर ट्रोल

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात ४९.८४  टक्के मतदान झाले. तेव्हापासून सोशल मीडियापासून इतर अनेक माध्यमांवर पुणेकरांना ट्रोल करण्यात येत आहे. मतदान यादीत चुकीचे नाव, केंद्रातील यादीत नाव नसणे, उमेदवाराने जनहिताची कामे न करणे, यांसारख्या कारणांमुळे पुणेकरांनी मतदान केले नसावे, असा सूर आहे.

सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा उमेदवार नव्हता. जे दोन चेहरे उमेदवार होते; त्यांना मतदान करावेसे वाटले नाही.
- तात्यासाहेब नागवडे 

मी खडकवासला मतदारसंघातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी मतदानासाठी सर्व कागदपत्रे अर्जासह भरून दिली होती. जवळच्या ग्रामपंचायतीत दोनदा अर्ज भरला होता. अनेकदा फेरतपासणी करूनही यादीत नाव आले नाही. मात्र, चौकशी करूनही नाव यादीत नसल्यामुळे मतदान केले नाही.
- पूजा मोरे 

‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण आहे. ती बदलून आता ‘पुणे तिथे मतदान उणे’ अशी करावी लागणार आहे. पुणेकर सर्वच बाबतीत मोठ्या हिरीरीने भाग घेतात. मात्र, मतदान का करीत नाहीत, हे कोडे उलगडले नाही. योग्य उमेदवार नसेल, तर नोटाचादेखील पर्याय होता.
- संध्या मोरे

पुण्यात झालेली विकासकामे समाधानकारक आहेत. त्यामुळे आणखी विकास नको की काय, असे नागरिकांचे मत निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे नागरिक मतदानाला आले नाहीत. 
 - आनंदा टोळे 

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी पुण्यात ६० टक्‍क्‍यांच्या आत मतदान होते. त्यामुळे मताचे महत्त्व पटवून देण्यात उमेदवार आणि सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. नागरिकांनी हक्कांबाबत जागरूक असले पाहिजे. 
- सोमेश्‍वर कुंभार 

मी आडनाव बदलल्यामुळे पूर्वीच्या नावाने मतदान यादीत नाव होते. माझ्या इतर सर्व कागदपत्रांवर बदललेले नाव आहे. मतदान कार्डवर नाव बदलण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे अर्जासह भरले होते. मात्र, बदललेले नाव यादीत नव्हते. त्यामुळे मतदान करता आले नाही. अन मला माझा अधिकार बजावता आला नाही.
- स्वस्तिका कोमसकर-पोटफोडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : शिरुरमधून अमोल कोल्हे ९ हजार तर विशाल पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर, पुण्यातून रविंद्र धगेंकरांनी घेतली आघाडी

India Lok Sabha Election Results Live : भाजपाने गाठला बहुमताचा आकडा.... राहुल गांधींचे हृदयाचे वाढले ठोके; जाणून घ्या तासाभराचे कल

Lok sabha Election 2024 : EVM मशिनमध्ये कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना? हे मतमोजणीपूर्वी कसे तपासले जाते? घ्या जाणून

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचा धुव्वा ; ॲनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडाची प्रभावी गोलंदाजी

Lok Sabha Election 2024: लोकसभेत विरोधी पक्ष कसा निवडला जातो अन् विरोधी पक्ष नेत्याला कोणते लाभ मिळतात? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT