Pune News
Pune News Sakal
पुणे

Pune News : वालचंदनगरच्या गौरी थोरात उपविजेत्यापदाचा बहुमान

राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील गौरी अशोक थोरात -तावरे हिने मलेशिया मधील क्वालालंपूर येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड हेरिटेज या स्पर्धेमध्ये उपविजेते होण्याचा बहुमान मिळाला.

सिंगापूरच्या ई प्लॅनेट यांच्यातर्फे मलेशियामधील क्वालालंपूर मध्ये मिस व मिसेस वर्ल्ड हेरिटेज आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमधील जगातील २६ देशांनी सहभाग नोंदवला होता. गौरी थोरात हिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या आठ फेऱ्यांमध्ये भारताच्या ऐतिहासिक ,कला व सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे सादरीकरण गौरी यांनी प्रभावीपणे सादर केले.

स्पर्धेमध्ये गौरी हिला उपविजेतेपद पटकावले.तसेच सर्वोत्कृष्ट लोकप्रिय स्पर्धक ही विशेष ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे विजेतेपद थायलंड देशाला मिळाले असून उपविजेतेपद नेदरलँड व भारताला विभागून देण्यात आले.

गौरी या मूळच्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील आहेत. त्यांचे सासर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील असून त्यांचे पती अशोक रमेश थोरात हे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक या उच्च पदावर कार्यरत आहेत. गौरी थोरात संगणक शास्त्राच्या पदवीधर असून त्यांनी ' साक्षात जिजाऊ' या एकपात्री प्रयोगाचे आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात १६० प्रयोग सादर केले आहेत. गौरी यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हा मानाचा मुकुट मिळवून देशाच्या नावलौकिकात भर टाकली असून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Jonty Rhodes : गंभीर 2019 पासूनची परंपरा मोडणार; जॉन्टी रोड्स होणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT