Malnourished Children Pune sakal
पुणे

Malnourished Children Pune : पुण्याच्या अंगणवाड्यांमध्ये 346 कुपोषित बालके, कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा परिषदेची खास मोहीम

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सद्यस्थितीत एकूण 346 कुपोषित बालके दाखल आहेत. यापैकी 44 बालके अतिकुपोषित तर 302 बालके मध्यम कुपोषित आहेत.

निलेश बोरुडे

Malnourished Children Pune - पुणे जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील मुलांसाठी कुपोषणमुक्त बालके ही मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यासाठी पन्नास दिवसांचा विशेष कृती कार्यक्रम तयार करण्यात आला असून पश्चिम हवेलीतील खानापूर केंद्रातील भरेकरवाडी व माताळवाडी येथून जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी हवेलीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अक्षदा शिंदे, विस्तार अधिकारी सुरेश गुंजाळ आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सद्यस्थितीत एकूण 346 कुपोषित बालके दाखल आहेत. यापैकी 44 बालके अतिकुपोषित तर 302 बालके मध्यम कुपोषित आहेत. या बालकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी 288 अंगणवाडी केंद्रांमध्ये पुढील 50 दिवसांसाठी 'ग्राम बाल विकास केंद्रे' सुरु करण्यात आली आहेत.

या केंद्रांमध्ये संबंधित बालकांसाठी आवश्यक आहार व औषधाचे संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पन्नास दिवसांच्या या उपक्रमासाठी संबंधित अंगणवाडी सेविकांना प्रतिबालक पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

यादरम्यान आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी सातत्याने या बालकांची तपासणी करणार आहेत. तसेच हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा यासाठी इतर तालुक्यातील अधिकाऱ्यांची तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवून शंभर टक्के कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रकल्पनिहाय कुपोषित बालके

आंबेगाव-27, मंचर -15, बारामती (1)-9, बारामती (2)-15, भोर-8, दौंड (1)-11, दौंड (2)-2, हवेली-3, उरुळी कांचन-6, इंदापूर (1)-11, इंदापूर (2)-28, जुन्नर -41, नारायणगाव -17, खेड (1)-18, खेड (2)-40, मावळ-16, मुळशी-6, पुरंदर-30, शिरुर (1)-7, शिरूर (2)-12, वेल्हे-24

"पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी 288 ठिकाणी ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली असून कुपोषित बालकांना पुढील पन्नास दिवस पोषक आहार व औषधांची समन्वयीत मात्रा देण्यात येणार आहे.

प्रभावी अंमलबजावणीसाठी इतर तालुक्यातील अधिकाऱ्यांचे पथक दर आठवड्याला अचानक भेट देऊन या केंद्रांची तपासणी करणार आहे. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही हि केंद्रे सुरू असणार आहेत." जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, पुणे जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT