mumbai crime news 20 year old girl sexually assaulted on moving local train
mumbai crime news 20 year old girl sexually assaulted on moving local trainesakal

Mumbai Crime : मुंबईत धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये झालेल्या एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेने मुंबई हादरली

मुंबई : चर्चगेट परिसरातील महिला वसतिगृहात एका विद्यार्थिनीच्या हत्येला आठवडा उलटला नाही, तोच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये झालेल्या एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेने मुंबई हादरली आहे.

सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान धावणाऱ्या मुंबई-पनवेल लोकलमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना बुधवारी (ता. १४) समोर आली आहे. आरोपीला चार तासांत अटक झाली असून नवाजू करीम शेख (वय ४०) असे त्याचे नाव आहे.

mumbai crime news 20 year old girl sexually assaulted on moving local train
Mumbai News : त्या यू टर्न वरील वाहतूक मार्गात बदल; ठाकुर्ली उड्डाणपूल जवळील डाव्या वळणावरील वाहतूक बंद

या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर इथल्या कॉलेजला जाण्यासाठी सीएसएमटीवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून सकाळी ७.२६ वाजताची सीएसएमटी-पनवेल लोकल पकडली.

ती महिलांच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. सकाळची वेळ असल्यामुळे डब्यामध्ये विशेष प्रवासी नव्हते. याचाच फायदा उचलत सीएसएमटीला गाडीने वेग घेतल्यानंतर आरोपी डब्यात चढला. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने या तरुणीशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला.

mumbai crime news 20 year old girl sexually assaulted on moving local train
Mumbai Crime : कर्ज फेडण्यासाठी  त्याने निवडला चोरीचा मार्ग...हाती पडल्या बेड्या

पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी मशीद बंदर स्थानकावर लोकलमधून उतरला आणि पळून गेला. पीडित तरुणीदेखील मशीद बंदर स्टेशनवर उतरली आणि झालेल्या प्रसंगाची माहिती तिने रेल्वे पोलिसांना दिली.

सीसीटीव्हीवरून माग काढला
सीएसएमटी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच रेल्वे पोलिस यंत्रणा कामी लागली. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अवघ्या चार तासांत मशीद बंदर रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अटक करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

(mumbai crime news 20 year old girl sexually assaulted on moving local train)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com