ajiit-paw.jpg 
पुणे

सकाळी आंदोलन अन् दुपारी अजित पवारांच्या मांडीला मांडी...

सकाळवृत्तसेवा

पुणे  : कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरले होते; पण पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हेच महापौर दुपारी मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांसमवेतच्या बैठकीला हजर राहिले.

उपमुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीचा सोपस्कार पूर्ण करत महापौर मोहोळांनी पालकमंत्र्यांकडे पुणेकरांच्या मागण्यांची लांबलचक यादीही दिली. परिणामी, सरकारविरोधात आंदोलन आणि सरकारमधील एका मंत्र्यासोबतच्या बैठकीने महापौर मोहोळ राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. 

कोरोनाच्या मुद्यावरून राज्यातील विरोधकांनी अर्थात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, कोरोनाला गर्दीचा बाधा असूनही भाजप नेते आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. या आंदोलनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र बचाओ'ची हाक देण्यात आली.

पुण्यातील आंदोलनात भाजप शहराध्य जगदीश मुळीक यांच्यासह महापौर मोहोळही रस्त्यावर उतरले. तेव्हा, याच महापौरांनी सरकारवर घाणाघाती टीकाही केली. त्यानंतर मात्र, नियोजित पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीला महापौर मोहोळ वेळेत उपस्थितीत राहिले. दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने केलेल्या कामांसह पुढच्या नियोजनाचा पवार यांनी शुक्रवारी आढावा घेतला. 

महापौर मोहोळ म्हणाले, "मी कधी आंदोलन केले आणि कोणासोबत बैठकीला होतो, यापेक्षा माझा पुणेकर नागरिक कोरोनापासून सुरक्षित राहिला पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्यावरून राजकारण करू नये. सध्या पुणे शहराला आणि कोरोनाविरोधातील मोहिमेत जे काही अपेक्षित आहे, त्याबाबत मी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. विशेषत: नागरिकांच्या तपासणीची क्षमता वाढविण्याचा माझा आग्रह आहे.'' महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी, नवल किशोर राम, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शहरातील कोणत्या भागात रुग्ण आहेत, त्यांच्या वाढीचा वेग, बाधित क्षेत्र आणि त्याबाहेरील हद्दीतील रुग्ण वाढीचे प्रमाण, मृत्यूदर, मृतांची कारणे, लॉकडाउनमधील शिथिलता, त्याचे परिणाम, याची सविस्तर माहिती रुबल अग्रवाल यांनी पवार यांना दिले. दरम्यान, स्मार्टसिटीने निर्माण केलेल्या "डॅशबोर्ड'सह सर्व यंत्रणेची माहिती जाणून घेताच त्याबाबत पवार यांनी समाधानही व्यक्त केले. 

पवार म्हणाले, "कोरोनाच्या संकटाचा सामाना एकत्रित करायचा आहे. रोज सापडणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना, नव्या रुग्ण आढळून येणार नाहीत, यादृष्टीने कठोर नियोजन करा. या मोहिमेसाठी जिथे कुठे निधी लागेल, त्यासाठी मोकळेपणाने मागणी करा, पुरेशा प्रमाणात निधी पुरविण्यात येईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT