Raj Thackeray Sakal
पुणे

Raj Thackeray News : पुण्यात पाऊल ठेवताच राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! वंसत मोरेंची घेतली भेट

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती. यादरम्यान पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता. मात्र आता खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे वसंत मोरे यांच्यासाठी पुण्यात आले आहेत.

राज ठाकरे यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना पक्षाचे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली तसेच मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेणार असून या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध आहे. या प्रकल्पांतर्गत सहा हजार झाडांची कत्तल होणार असल्याच्या कारणाने अनेक पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाचा विरोध केला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात असताना वसंत मोरे यांनी त्यांना या प्रकल्पाबाबत अधिक माहिती दिली.

राज ठाकरे यांनी या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर या प्रकल्प संदर्भात फोटो आणि माहिती मागून घेतली आहे. यामुळे नदी सुधार प्रकल्प संदर्भात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राज ठाकरे यांचे श्वान प्रेम

पुणे दौऱ्य़ात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वान प्रेम समोर आलं आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष पक्षाचे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली.

तसेच वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी येथे सुरू झालेल्या केंद्राचा आढावा देखील घेतला. राज ठाकरे यांचे श्वान प्रेमी सर्वश्रुत आहे. ग्रेड डेन प्रजातीचे "जेम्स" नावाचा श्वान राज ठाकरे यांच्याकडे होता मात्र जून २०२१ मध्ये त्याचे निधन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT