monsoon sakal
पुणे

Monsoon : पुणे शहरात लवकरच होणार मॉन्सूनचे आगमन

तळ कोकणात दाखल झालेल्या मॉन्सूनची वाटचाल अरबी समुद्रातील बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे थांबली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तळ कोकणात दाखल झालेल्या मॉन्सूनची वाटचाल अरबी समुद्रातील बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे थांबली होती. आता चक्रीवादळाचा परिणाम निवळ्यावर रविवारनंतरच (ता.१८) शहरात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तो पर्यंत दिवसभर ढगाळ हवामान तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गुरुवारी दिवसभर शहरात ढगाळ हवामान होते, तर उपनगरांमध्ये काही ठिकाणी वारा सुटल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी ऊन-सावलीच्या खेळामध्ये उकाडाही जाणवत होता. मॉन्सूनचे आगमन लांबले असतानाच आता पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. रविवारपर्यंत तरी शहरात आकाश अंशतः ढगाळ आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापर्यंत तरी पुणेकरांना मॉन्सूनच्या पहिल्या पावसाची प्रतिक्षा करावी लागेल.

मॉन्सूनची प्रगती...

कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोचल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (मॉन्सून) महाराष्ट्रातील वाटचाल थांबली आहे. चक्रीवादळ निवळल्यानंतर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तळ कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनचे सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागांत प्रगती केली.

त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. रविवारपर्यंत (ता. १८) ही वादळी प्रणाली राजस्थानमध्ये निवळून जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मॉन्सून पुढे चाल करण्याचे संकेत आहेत. १८ ते २१ जून दरम्यान दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाचे....

- शहरात ढगाळ हवामान कायम

- रविवारनंतर मॉन्सून पुढे चाल करण्याचे संकेत

- चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर उंच लाटा

- शहरातील कमाल सरासरी तापमान ३२ अंशाच्या दरम्यान असणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन फसलं

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT