Sharad Pawar in Lonavala Esakal
पुणे

Sharad Pawar in Lonavala: शरद पवारांची खेळी अजितदादांवर भारी! राजीनामा दिलेले 137 पदाधिकारी पुन्हा पक्षात

Sharad Pawar's game! 137 office bearers who resigned are back in the party... | आज अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. 137 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Sharad Pawar in Lonavala : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील 137 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, लोणवळ्यातील अजित पवार गटातील या 137 जणांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला.

मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पाठिंबा देणं हा अजित पवारांना लोणावळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. त्यासोबतच काही दिवसांवर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना मोठा धक्का आहे.

शरद पवारांचं जंगी स्वागत

आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांच स्वागत झालं. यावेळी तुतारी वाजवण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत. हे दाखवण्यासाठी लोणावळ्यात “वेळ पण तीच, मालक पण तोच” ही नवीन टॅग लाईन तयार करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT