Loksabha Election: एकेकाळी मुलाप्रमाणे वागवलेले आनंद परांजपे अपक्ष लढणार? कल्याण लोकसभेत शिंदे VS राष्ट्रवादी लढणार असल्याच्या चर्चेला उधाण

Loksabha Election: देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. राज्यात जागावाटप, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच काही जागांवर युतीतील पक्षांनी दावा केल्याने नाराजीचे चित्र दिसून येत आहेत.
Loksabha Election
Loksabha ElectionEsakal

देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. राज्यात जागावाटप, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच काही जागांवर युतीतील पक्षांनी दावा केल्याने नाराजीचे चित्र दिसून येत आहेत. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुती पक्षातील अंतर्गत वाद क्षमून आता वातावरण काहीसे अलबेल झाल्याचे चित्र गेल्या महिन्याभरापासून दिसत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. विकासकामांवरुन सत्ताधाऱ्यांवर झोड घेणारे इतर पक्षांचे नेते त्यांच्याच मांडीला मांडी लावून कार्यक्रमात एकत्र वावरताना दिसले. तर मित्रपक्षाने देखील काहीशी नमती भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यामुळे निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांना क्षमविण्यात शिवसेना यशस्वी झाली का? अशी चर्चा सुरु असतानाच युती पक्षातीलच राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे आनंद परांजपे यांनी अपक्ष लढून शिवसेनेला आव्हान देणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी राज्याचे लक्ष लागले आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याकडे. ठाणे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा असून या दोन्ही जागा भाजपकडे जाऊ नये या भूमिकेत शिवसेना शिंदे गट आहे.

तर दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी भाजपकडून खेचून आणलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे राहिल अशी भूमिका भाजपने घेतल्याचे दिसून येत आहे. या भूमिकेतून तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात अंतर्गत वादातून शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष देखील पहायला मिळाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे यांचा प्रचार न करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. तर ठाणे व कल्याणची जागा आपल्या हातून जाऊ नये यासाठी शिवसेनेकडून दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याचे बोलले जात आहे.

Loksabha Election
Ajit Pawar Post: "चूक स्वीकारा पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका", अजित पवारांची चुकीची पोस्ट शरद पवार गटाने सुधारली?, नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला शिंदेंकडेच राहणार कि भाजपकडे जाणार याबाबत अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे दिसून येते.

कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असून दोन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवाय आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात देखील त्यांनी याच मतदारसंघातून केली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेकडेच हा मतदारसंघ राहणार असे बोलले जात असतानाच भाजपाने देखील येथे चाचपणी केली आहे.

भाजपकडून मंत्री रविंद्र चव्हाण व आमदार किसन कथोरे यांचे नाव चर्चेत आहे. तर मनसे पक्षाने देखील येथे चाचपणी केली असून आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. या आमदारांनी विकास कामांवरुन खासदार शिंदे यांना वारंवार कोंडीत पकडले असल्याने ते खासदार शिंदे यांना काटे की टक्कर देणार अशी चर्चा रंगली होती. मात्र काही कार्यक्रमांत हे विरोधक मांडीला मांडी लावून बसत एकमेकांच्या कामांची स्तुती करताना दिसत असल्याने वातावरण काहीसे थंड झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे खासदार शिंदे यांना वातावरण अनुकूल झाले असे वाटू लागले असतानाच एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Loksabha Election
Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यासह 'या' भागात अवकाळी पावसाचे संकट कायम, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राजकीय वर्तुळात कोणती चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) चे आनंद परांजपे यांचे नाव आता पुढे आले आहे. परांजपे यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून थेट सत्तेच्या बाजूने उडी घेत ठाण्यात शिंदे गटाची कोंडी केली आहे. त्यातच आता कल्याण लोकसभा मतदारसंघातून ते अपक्ष निवडणूक लढणार अशा चर्चेला उधाण आल्याने ते खासदार शिंदे यांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. या मतदार संघातील भूमिपुत्र, ब्राम्हण वर्ग, नामवंत सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, 27 गाव, 14 गावातील लोकप्रतिनिधी यांनी परांजपे यांची भेट घेतली असून त्यांना अपक्ष म्हणून उभे राहण्याची विनंती केली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाली आणि या मतदारसंघाचे पहिले खासदार पद आनंद परांजपे यांच्या गळ्यात मतदारांनी टाकले. खासदार म्हणून या मतदारसंघातील विविध विकासकामांवर त्यांनी प्रकाश झोत टाकला आहे. त्यांचा जनसंपर्क याठिकाणी दांडगा राहीला आहे. शिवसेनेला दगा दिल्याने त्यांच्यावर शिवसैनिक नाराज असले तरी त्यातही परांजपे यांच्यासोबत जाणारा एक गट आहे.

महायुतीत असलेल्या भाजपचा तसेच मनसेचा परांजपे यांना छुपा पाठिंबा मिळू शकतो. स्थानिक भूमिपुत्र देखील त्यांना पाठिंबा दर्शवतील. तेथील लोकप्रतिनीधी मी राहीलो असल्याने तेथील काही नामांकित संस्थाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ येऊन भेटले आहेत. त्यांनी मला विचारणा केली आहे. लोक मला विचारतात त्यांना मी उत्तर देतो की मी आता महायुतीमध्ये आहे, असं आनंद परांजपे, यांनी म्हटलं आहे.

Loksabha Election
उजनी धरणातून १० मार्चला सोलापूरसाठी पाणी! भीमा नदीकाठावरील वीजपुरवठा राहणार बंद; जलसंपदा विभागाचे ‘महावितरण’ला पत्र

आनंद परांजपे कोण आहेत?

जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनीच बोट धरुन आनंद यांना राजकारणात आणले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा पोटनिवडणूकीत 90 हजार मतांनी पराभव करत परांजपे यांनी बाजी मारली.

त्यानंतर लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेत शिंदे यांनी परांजपे यांना कल्याण या नव्या लोकसभा मतदार संघातून रिंगणात उतरविले. शिंदे म्हणतील ती पूर्वदिशा या न्यायाने वागणारे परांजपे यांनी त्यावेळी वसंत डावखरे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारास 2009 मध्ये पराभवाची धूळ चारली. ठाणे महापालिकेच्या 2012 मधील निवडणूकीत परांजपे यांनी शिंदे आणि शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

ज्याला मुलाप्रमाणे वागविले त्याने दगा केल्याची बाब शिंदे यांच्या जिव्हारी लागली होती. 2014 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांनी मुलगा श्रीकांत याला रिंगणात परांजपे यांच्या विरोधात उतरविले. श्रीकांत शिंदे यांनी पराजंपे यांना पराभवाची धुळ चारली होती. 2019 च्या निवडणूकीत परांजपे ठाणे लोकसभा मतदार संघातून रिंगणात उतरले. तेव्हा मोदी लाटेत त्यांना चार लाखाहून अधिक मतांनी पराभव स्विकारावा लागला होता.

Loksabha Election
मुलींसाठी सर्वाधिक व्याज देणारी पोस्टाची भन्नाट योजना! उच्चशिक्षण, विवाहाची मिटेल चिंता; ‘ही’ कागदपत्रे जोडा व‌ २५० रुपये ते दीड लाखांपर्यंत रक्कम गुंतवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com