bjp ncp sakal
पुणे

भाजपच्या सुरात राष्ट्रावादीचा सूर

ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्यास सशर्त पाठिंबा

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : भाजपने शहर विकायला काढले आहे अशी टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अवघ्या चार दिवसात त्यांची भूमिका बदलून भाजपच्या सूरात सूर मिसळला आहे. १८५ ॲमेनिटी स्पेसचा मास्टर प्लॅन सादर करावा आणि ३३ टक्के जागा नागरी वन (अर्बन फॉरेस्ट) साठी आरक्षीत ठेवावी या अटी भाजपने मान्य करायचे आश्‍वासन दिले आहे. याची उपसूचना मुख्यसभेत दिली जाणार असून, भाजपने ती स्वीकारली तर या जागा खासगी व्यावसायिकांना देण्यास राष्ट्रवादीची काही हरकत नाही, अशी भूमिका खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून भूमिका ठरवावी अशी सूचना केली होती. त्यानुसार काल (मंगळवारी) राष्ट्रवादीची बैठक झाली. भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रवक्ते अंकुश काकडे यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी जेव्हा ॲमेनिटी स्पेस विक्रीला काढण्याचा प्रस्ताव आणला होता, तेव्हाच आम्ही याबाबतचा मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. आता भाड्याने देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी मांडलेला असताना त्यात देखील १८५ ॲमेनिटीस स्पेसच्या वापराबाबत मास्टर प्लॅन नाही. ॲमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घमुदतीने ९० वर्षासाठी भाड्याने देणे म्हणजेच त्या विकल्या सारखेच आहे. या जागांचा वापर कसा होणार आहे? त्यातून कोणत्या सुविधा मिळणार? याचा त्यात उल्लेख हवा. खेळाची मैदाने, उद्याने या जागा उरलेल्या जागांमधील ३३ टक्के मोकळी जागा ही अर्बन फॉरेस्टसाठी राहिली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. नागरिकरण वाढत असताना शहरात हिरवी चादर असणे आवश्‍यक आहे. झाडांमुळे कार्बनडाय आॅक्साइचे प्रमाण कमी होईल, तसेच पावसाची पाणी जमिनीत मुरण्यासाठी ही ३३ टक्के जागा आवश्‍यक आहे. या दोन्ही मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन भाजपने दिले आहे. त्याच्या उपसूचना मान्य करणार असतील तर हा प्रस्ताव आम्ही मान्य करू, असे चव्हाण यांनी सांगितले.

त्याबाबत पुढे विचार करू

एकीकडे मास्टर प्लॅन सादर करा म्हणत असताना शाळा, रुग्णालयांच्या जागा खासगी विकसकाला देताना त्यात सामान्य पुणेकरांसाठी सवलत असणार का? शाळा प्रवेशासाठी जागांचे आरक्षण असणार का? याबाबत चव्हाण यांना विचारले असता, त्याचा विचार आत्ताच केलेला नाही. पण पुढे तो करण्यात येईल, असे त्यांनी सांगितेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT