कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग 17,18 आणि 19 येथील कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Garbage
Garbagesakal

कॅन्टोन्मेंट: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग 17,18 आणि 19 येथील कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दररोज व वेळोवेळी परिसराची स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. या मध्ये कासेवाडी, 278 महात्माफुले, लोहियानगर, गंज पेठ, 10 नंबर कॉलनी, टिंबर मार्केट, मोमीनपुरा, लाईट बाजार, सावित्री बाई फुले स्मारक परिसर, चुडामण तालीम तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात देखील हीच परिस्थिती ओढवली आहे.

Garbage
जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सागर मोकाशी यांनी बांधले शिवबंधन

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण तिन्ही प्रभागात असणारे सफाई कामगार, मेहतर व बिगारी या सेवक वर्गांची संख्या तब्बल 691 आहे. तसेच 23 प्रकारच्या गाड्या कचरा उचलण्यासाठी आहे. त्यात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छ संस्थेची सुमारे 300 कर्मचारी काम करतात. तरी देखील प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे डास व दुर्गंधीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तत्सम आजारांनी नागरिक सध्या पीडित आहे. अनेकदा क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करून ही भारत स्वच्छ या अभियानाला मनपाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.

याक्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 60 ते 70 टक्के भाग हा झोपडपट्टीचा आहे. रोजची घंटागाडी येत नसल्याने कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने ठिकठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक परिसरात पावसाळी व ड्रेनेज लाईनला असणारी चेंबर ची झाकणे मोडकळीस तर अनेक ठिकाणी गायबच झाली आहे. दरम्यान पावसाच्या वातावरणात रस्त्यावर साठलेला हाच संपूर्ण कचरा या चेंबरामध्ये जाऊन साठतो. त्यामुळे चेंबर तुडुंब भरून अनेकांच्या घरात व रस्त्यावर मैला व घाण पाणी साठण्याची समस्या कायम तोंड वर करून उभी आहे.

Garbage
आम्ही लोकशाही पध्दतीने आंदोलन करतो

"278 महात्माफुले पेठ,भिमाले संकुलच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूस कचऱ्याचा ढीग पडलेला असून घाणीचे साम्राज्य आहे, याठिकाणी रोजच्या रोज कचरा उचलला जात नाही, नागरिकांना घाणीचा त्रास होत असून तेथे दुर्गंधी येत आहे तसेच रोगराई पसरण्याची भीती आहे, तसेच सदर ठिकाणी एखादा व्यक्ती नेमून तेथे कचरा घाण टाकणाऱ्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी."

-ॲड. सागर काळे ( सेक्रेटरी भिमाले संकुल सोसायटी )

"दररोज कचरा उचलला जातो, आमचे सेवक सकाळ संध्याकाळ काम करत असतात. राडा रोडा उचलण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली जाते. लोकांमध्ये जनजागृती होणे अपेक्षित आहे."

- मुक्तार सय्यद, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com