पुणे

स्पर्धा परीक्षांची केंद्र, क्रीडांगणे होणार खुले;पुणे महापालिकेकडून नवे आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने स्पर्धा परीक्षा केंद्र ५० टक्के क्षमतेने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आठवड्याचे सर्व दिवस आउट डोअर व इनडोअर गेम खेळता येणार आहेत. यासाठी लसीकरण अनिवार्य असणार आहे. याबाबत शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आदेश काढले आहेत.

कोरोनामुळे शहरात तिसऱ्या स्तराचे नियम लागू झाल्याने कोचिंग क्लास बंद केले होते. ऑनलाइन वर्ग सुरू होते. मात्र, महापालिकेने आता स्पर्धा परीक्षा केंद्र व क्लासेस सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. या ठिकाणी येणारे विद्यार्थी व शिक्षकांना किमान कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला असणे आवश्‍यक आहे.

महापालिकेच्या हद्दीतील सर्व आउटडोअर व इनडोअर खेळ आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चारपर्यंत खेळता येणार आहेत. या ठिकाणी सर्व खेळाडू व कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस झालेले असणे अनिवार्य आहे. हे नियम पुणे कॅन्टोन्मेंट व खडकी कॅन्टोमेंटला देखील लागू असणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT