पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात
Admin

पुणे : ''कोरोनाचे नियम पाळून आम्ही चालणार आहोत. शासन जी संख्या ठरवून देईल तेवढेच लोक आम्ही चालू याची खात्री मी देतो, पण आम्ही चालणारच. यापुढे पोलिसांनी स्थानबद्ध केले तरच पायी वारी थांबले, अशी भूमिका व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी आज पोलिसांसमोर आळंदीत घेतली.

आळंदीवरुन पंढरपुरला पायी वारीने जाण्यासाठी निघालेल्या व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, कीर्तनकार बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने आषाढी वारीसाठी नियमावली जारी केली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारचा निर्णय नाकारुन बंडातात्या यांनी पायी वारीसाठी निघाले होते.

समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे शुक्रवारी बंडातात्या कराडकर यांनी आळंदी येथे जाहीर केले होते. आज माऊलींच्या चल पादुकांचे देवूळवाड्यातून सव्वा सहाला प्रस्थान झाल्यानंतर अर्धा तासाच्या अंतराने बंडातात्या कराडकर महाराज आणि त्यांचे अनुयायी चाकण चौक येथून नवीन पुल ओलांडून सुमारे दिडशे मीटर पायी चालले. त्यांच्या सोबत शंभरहून अधिक वारकरी चालत होते. यावेळी पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचा मार्ग रोखला. यावेळी पोलिसांना वारक-यांची पायी चालण्याची भूमिका कराडकर सांगत होते. दिघी येथील संकल्प मंगल कार्यालयात बंडातात्या कराडकर यांना ठेवण्यात आले आहे. बंडातात्या यांना ताब्यात घेतल्यामुळे वारकरी आक्रमक झाले आहेत. पायी वारीसाठी आग्रही असणारे वारकऱ्यांनी बाहेर भजनाला सुरुवात केली आहे. वारकऱ्यांनी भजनी आंदोलन पुकारल्याचं बोललं जात आहे.

पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात
...तर मला मुख्यमंत्री करा - संभाजीराजे छत्रपती

दिंडी निघालीय आता थांबणं शक्य नाही -

''पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल तरी चालेल. आमची तयारी आहे. आळंदीतून बाहेर पंढरीच्या दिशेने पाऊल टाकले आता थांबणार नाही.आम्हाला पंढरपूरपर्यंत विना अडथळा चालू द्या. मला अधिक बोलायला लावू नका. मी नासका आहे. काल कराडला कृष्णा सहकारी साखऱ कारखान्याच्या विजयोत्सवात दहा हजार कार्यकर्त्यांची गुलाल उधळला तिथे कोरोना पॉझीटीव्ह नव्हता. कोरोनाचे नियम आम्हाला मान्य् आहे. उद्या सकाळी आम्ही पुन्हा चालू आणि चालताना तिन फूटाचे अंतर वारक-यांमधे राहील. चालण्यासाठी वारक-यांची पंचविस संख्या ठेवली तरी आम्हाला मान्य आहे. त्यापेक्षा अधिकची संख्या वाढणार नाही हे मी लिहून देतो. आता घऱी जावू पण उद्या सकाळी पुन्हा चालू.''

यावेळी अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे,वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी कराडकर महाराजांना सामोरे जावून त्यांना पायी वारी थांबविण्याबाबत मनधरणी करत होते. मात्र तरिही कराडकर महाराजांनी पवित्रा बदलला नाही. अखेर पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त अॅड माधवी निगडे यांनी शिष्टाई करत आजच्या दिवसापूरते पायी वारीचे आंदोलन स्थगित करण्यास कराडकर महाराजांचे यांचे मन वळवले. आणि त्यानंतर आरती म्हणून वारकरी माघारी परतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com