Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident : 'नेमकं आठवत नाही...', अल्पवयीन आरोपीने तपासात दिली उडवाउडवीची उत्तरे; पुन्हा चौकशी करणार

Pune Porsche Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. परंतु या वेळी अल्पवयीन आरोपीने पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

सनील गाडेकर @sanilgadekar

पुणे : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. परंतु या वेळी अल्पवयीन आरोपीने पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याने तपासात सहकार्य केले नसल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

गुन्हे शाखेच्या पथकाने येरवडा येथील बाल न्याय मंडळासमोर शनिवारी (ता. १) अल्पवयीन आरोपीची सुमारे एक तास चौकशी केली. या वेळी त्याची आई शिवानी अग्रवाल आणि बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोपी मुलाला पोलिसांनी काही प्रश्न विचारले.

परंतु त्यावर ‘आता नेमके आठवत नाही,’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यासाठी बाल न्याय मंडळाची परवानगी घेतली होती. अल्पवयीन आरोपीची चौकशी करताना त्याचे पालक आणि बाल संरक्षण अधिकारी उपस्थित असणे आवश्यक असते. त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिसांचे पथक मुलाची आई शिवानी अग्रवालला घेऊन बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात पोचले. मात्र, चौकशीत अल्पवयीन आरोपीला विचारलेल्या प्रश्नांवर त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अल्पवयीन आरोपीची पुन्हा चौकशी करणार-

अल्पवयीन आरोपीने आज पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे पुन्हा अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी बाल न्याय मंडळाकडे परवानगी घेण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला हे विचारले प्रश्न-

अपघातावेळी मोटार कोण चालवीत होते?

अल्पवयीन मुलाकडून मिळालेले उत्तर- नेमके आठवत नाही.

कोझी आणि ब्लॅक पबमध्ये कोण कोण उपस्थित होते?

अल्पवयीन मुलाकडून मिळालेले उत्तर- लक्षात नाही.

ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेतले, त्यावेळी कोण कोण उपस्थित होते?

अल्पवयीन मुलाकडून मिळालेले उत्तर- नेमके आठवत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT