Pune Porsche Accident : "फक्त लिहला मी निबंध... पिझ्झाचा झाला प्रबंध!" पोर्शे अपघातावर RJ मलिष्काने बनवलं तिखटजाळ रॅप साँग

RJ Malishka Rap Song about Kalyani Nagar Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेला अपघात राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणात मोठे खुलासे देखील समोर आले आहे.
Pune Porsche Accident
RJ Malishka Rap Song esakal

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेला अपघात राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणात मोठे खुलासे देखील समोर आले आहे. या दरम्यान या अल्पवयीन मुलाच्या वर्तणुकीवर आणि या अपघातावर रॅप साँगदेखील समोर आले आहेत. यादरम्यान मुंबईची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरजे मलिष्‍काने देखील तिच्या सोशल मिडीयावर एक रॅप साँग शेअर केले आहे. त्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या रॅप साँगमध्ये मलिष्काने आत्तापर्यंत झालेले खुलासे आणि या संपुर्ण गोष्टीवर भाष्य केल्याचं दिसून येत. या प्रकरणात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी आणि माहिती न दिल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना एका शिपायाला तसेच दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

मलिष्काने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केलेल्या रॅप साँगमध्ये तिने म्हटलं आहे की, "जब मैं छोटा बच्चा था, बडी शरारत करता था. मेरी गाडी ठुक ही जाती, बचाने आता बाप. मी पुण्यामध्ये राहतो. माझ्या बापाचीच खातो, माझे वय आहे १७, रस्त्यावर लोकांना खतरा, पोर्शे बाहेर घेऊन गेले, दोन तरूण लोक मेले, पिऊन होता गाडीत बसला, इसमे कोई नही मसला. ब्लेम ड्रायव्हर पे ठोकेंगे, मेरी लाईफ थोडी रोकेंगे, वकिल आहेत आहे पैसा, तो डर कैसा औक किसका? जिसने parody बनाया इसपे एफआयआर लगाया, अरेस्ट झाले हॉटेलवाले, दोनो डॉक्टर अरेस्ट झाले. सस्पेंट झाले पोलिसवाले, पण मी???...फक्त लिहला मी निबंध... पिझ्झाचा झाला प्रंबध, आय एम स्टील नाबालीक ना...मैं तो बच्चा हु ना...जिसने parody बनाया उसपे एफआयआर लगाया... कारण बापाचा पैसा...तु रोकेगा कैसे???? पोर्शे कोणाची..बापाची..रस्ता कोणाचा बापाचा..वकिल कोणाचा ..बापाचा...Low and order कोणाचा बापाचा...आआआ हा... पब्लिकचा...तुझ्या बापाचे पैसै....देख रोकेंगे कैसे..कभी पोर्शे कभी pothole, कभी politics...कोई और झोल...public memory is very short भैय्या...सबसे बडा रूपय्या...मगर इस मेमरी की ना डुबे नैय्या..इसलिए मैं हुं ना...".

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: निबंध लिहिण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला अखेर पत्रकारांनी घेरलं; पण प्रश्न विचारताच...; व्हिडिओ व्हायरल

कोण आहे आरजे मलिष्का?

मलिष्का गेल्या अनेक वर्षांपासून 'रेड एफएम'ची आरजे आहे. तिला मुंबईची राणी म्हणूनही ओळखले जाते. मलिष्काने तिच्या लोकप्रिय मॉर्निंग शो 'बजाते रहो'मुळे चर्चेत आहे. मलिष्काने राजकारणी आणि मुंबई शहराची पालिका प्राधिकरण बीएमसीसाठी अनेक शो केले आहेत. याशिवाय तिने अनेक समस्यांबाबत लोकांमध्ये जागृती करण्याचे काम केले.

Pune Porsche Accident
Pune Porsche Car Accident : 'ते' ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीच्या आईचं नाही; शिवानी अग्रवाल यांची चौकशीही नाही, पोलिसांचा खुलासा

मलिष्काच्या श्रोत्यांना तिची शैली, स्वभाव, तिची स्थानिक भाषेशी असलेली जोड आणि तिची निर्भीड वृत्ती यामुळे ती आवडते. इतकंच नाही तर मलिष्काला 'आरजे ऑफ द इयर'साठी दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय मलिष्का 'झलक दिखला जा'मध्येही दिसली आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपला आवाजही दिला आहे.

मलिष्काने मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर आधारित गाणं तयार केलं होतं. त्याचे 'मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का' याआधीही व्हायरल झाले आहेत. 'मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का' या व्हिडीओमुळे मलिष्का चर्चेत आली होती.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: 'पाहिजे तेवढे पैसे घ्या पण, मारू नका...', पोर्श अपघातातील आरोपी काय ओरडत होता? वाचा, प्रत्यक्षदर्शीच्या शब्दांत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com