टिळक चौक - ‘नो हाँकिंग डे’ उपक्रमादरम्यान ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती करताना कार्यकर्ते. 
पुणे

एक, दोन, तीन, चार; नो हॉर्न बार बार

सकाळवृत्तसेवा

पुणे - लाइफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वतीने ‘नो हाँकिंग डे’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘नो हाँकिंग’ अर्थात एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी ही संकल्पना आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, लाइफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्रा. पद्माकर पुंडे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, दिलीप हल्याळ, पोपटलाल शिंगवी, प्रमोद ढेपे, साई पॅकेजिंगचे शंतनू प्रभुणे आदी उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी ‘एक, दोन, तीन, चार... नो हॉर्न बार बार...’, ‘एकत्र येऊया ध्वनी प्रदूषण कमी करुया’ अशा घोषणा दिल्या.

मकरंद टिल्लू म्हणाले, ‘रुग्णालय, महाविद्यालय अशा ठिकाणी हॉर्न न वाजविण्यासाठी फलक लावण्यात येतात. मात्र तरीही या परिसरामध्ये हॉर्न वाजविला जातो. या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.’

शहरातील बहुतांशी नागरिकांना अनावश्‍यक हॉर्नमुळे बऱ्याचशा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनावश्‍यक हॉर्न वाजवू नये.
- राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक पोलिस, पुणे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT