पुणे

Coronavirus: पुणे जिल्ह्यात कोरोना आटोक्यात; मृत्यूचे प्रमाणही आले निम्म्यावर

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात दिवाळीपूर्वी महिनाभराच्या तुलनेत सध्या कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांबाबत मात्र उलट चित्र दिसून येत असून हे प्रमाण दिवाळीनंतर सुमारे ५० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. मृत्यूचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. पुणे शहरात मात्र रुग्णसंख्येत अल्पवाढ झाली. शहरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ६८.३४ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. 

दिवाळीपूर्वी १२ ऑक्‍टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात २२ हजार ४६० नवे कोरोना रुग्ण सापडले होते. दिवाळीनंतर १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत २१ हजार ४७२ रुग्ण आढळून आले. यावरून दिवाळीपुर्वीच्या तुलनेत सध्या रुग्णांची संख्या ९८८ने कमी झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

मागील महिन्यात (१२ ऑक्‍टोबर ते १२ नोव्हेंबर) ४१ हजार ३८ जण कोरोनामुक्त झाले होते. चालू महिन्यात (२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर) २१ हजार ६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यावरून चालू महिन्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण जवळजवळ निम्म्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीआधीच्या महिन्यात जिल्ह्यात कोरोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

दिवाळीनंतर त्यात घट होऊन ही संख्या ४७१ झाली असून मृत्यूचे प्रमाण जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. पुणे शहरात दिवाळी आधीच्यामहिन्यात ९ हजार ५३४ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात अल्पवाढ होऊन ही संख्या ९ हजार ६०४ झाली आहे. शहरात दिवाळीपtर्वीच्या महिन्यात ५४० रुग्णांचा मृत्यू झाला होता. या महिन्यात १७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Dham Temple Tragedy : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू; गर्दीत विजेची तार पडली अ्न...

Jaggery Industry Law: गूळ उद्योगासाठी आता स्वतंत्र कायदा; साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठविणार

Nashik Sisters Drown : आई लगेच येईल, सांगून डॉक्टर बाबा दवाखान्यात गेले; 2 चिमुकल्या मुलींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : जोतिबा डोंगरावर आज श्रावणषष्ठी यात्रा; महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून तीन ते चार लाख भाविक येणार

Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

SCROLL FOR NEXT