पुणे

अन्यथा महाराष्ट्र बंद करणार; भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादांचं पुण्यात विधान

सागर आव्हाड

पुणे : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आज 26 जून रोजी पुण्यामध्ये आले आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांची ही नियोजित भेट आहे. भीम आर्मी संघटनेची राजकीय शाखा 'आझाद समाज पार्टी'च्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची नियोजित बैठक होती.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलंय की, उत्तर प्रदेशात लोकतंत्र नाहीये. यूपी सरकारने कोरोना काळात चुकीचे आकडे दिले आहेत. दीड वर्षात त्यांनी जे काम करायला हवं ते केलं नाहीये आणि इतर राज्यात मात्र निवडणुकीच काम केलं आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाचे मृत्यू नाहीत तर त्या हत्या आहेत. त्यामुळे, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

पुढे ते म्हणाले की, मागासवर्गीय आरक्षण रद्द झालंय. एस एसटी वंचित लोकांना नोकरीतील प्रमोशन दिलं जात होतं. भारतीय जनता पार्टीचं सरकार जो पर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, असंही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं, मात्र आता एस सी ,एसटी ओबीसी आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत नाहीये. या सरकारने माझ्या कार्यकर्त्यांना देखील अटकेत टाकलंय. मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण द्या. जर सरकारने मार्ग काढला नाही तर महाराष्ट्र बंद करणार. सरकार आरक्षणावरून भांडण लावण्याचं काम करतंय. देशात 100 टक्के आरक्षण लागू करा. मराठा आरक्षण आणि इतर आरक्षणावरून वाद लावण्याचं काम केलं जातंय. मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने प्रयत्न करायला हवं. जोपर्यंत मागासवर्गीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरू राहणार.

पुढे ते म्हणाले की, ओबीसी लोकांनी आता सतर्क राहा. भाजपचे लोक आरक्षणावरून दिशाभूल करत आहेत. हे लोक बोलतात एक आणि करतात एक, त्यामुळे भाजपबाबत लोकांनी सतर्क राहावं. पदोन्नतीमधील आरक्षण टिकणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT