Pune PMC  
पुणे

पुणे महापालिकेकडे 2 महिन्यात ९०० कोटीचा मिळकत कर जमा

नऊशे कोटीचा मिळकत कर जमा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे मिळकतकर भरण्यासाठी अतिरिक्त एका महिन्याची सवलत दिली होती, ही मुदत बुधवारी संपली असून, तीन महिन्यात महापालिकेकडे ९०६ कोटीचा मिळकतकर जमा झाला.

महापालिकेतर्फे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकर जमा करणाऱ्यांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. यंदाही आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनामुळे शहरात लॉकडाउन होता. त्यामुळे अनेक नागरिकांना मिळकतकर भरता आला नव्हता. त्यामुळे ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली होती.

एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ११ लाख १५ हजार मिळकतधारकांपैकी ५ लाख ९२ हजार ३०८ मिळकतधारकांनी कर भरला आहे. महापालिकेकडे ९०६ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये ४ लाख ४६ हजार ८९७ जणांनी ऑनलाइन, ७८हजार ४९२ जणांनी रोख, तर ६६ हजार ९१९ मिळकतधारकांनी चेकद्वारे कर भरला असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT