डॉक्टर दिनादिवशी पुण्यात नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्‍टर पतीनेही आत्महत्या केली.
डॉक्टर दिनादिवशी पुण्यात नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

वानवडी/पुणे : डॉक्‍टर पत्नीने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर, पत्नीच्या अंत्यसंस्काराचे विधी उरकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्‍टर पतीनेही गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी घडली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र पत्नीचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. (newly married doctor couple in pune suicide by hanging)

डॉ.अंकीता निखिल शेंडकर (वय 26) व डॉ.निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 28, रा. आझादनगर, गल्ली क्रमांक 2, वानवडी) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडकर दाम्पत्य वानवडीतील आझादनगर येथे मागील काही वर्षांपासून राहात होते. हांडेवाडी येथे त्यांचा दवाखाना होता. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डॉ. अंकीता यांनी राहत्या घरी गळफास घेतला. याबाबत वानवडी पोलिसांना खबर मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डॉ.अंकीता यांना तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शवविच्छेदन केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले. तसेच अधिक तपासासाठी व्हिसेरा राखुन ठेवण्यात आल्याचेही डॉक्‍टरांनी स्पष्ट केले.

डॉक्टर दिनादिवशी पुण्यात नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या
आळंदी : मानाच्या पालख्यांना पायी वारीस परवानगी पण......

शवविच्छेदनानंतर पोलिसांनी डॉ. अंकीता यांचा मृतदेह त्यांचे भाऊ ओमकार दत्तात्रय तळेकर (रा.उरळी कांचन) यांच्याकडे दिला. त्यानंतर बुधवारी रात्रीच डॉ. अंकीता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अंत्यसंस्कारानंतर गुरूवारी सकाळी सावडण्याचा कार्यक्रम झाला. दोन्ही वेळेस पती डॉ.निखील हा तेथे उपस्थित होता. त्यानंतर ते घरी परतले. सकाळी सात वाजता डॉ.निखील हा आंघोळ करण्यासाठी बाथरूमध्ये गेला. तेथेच त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com