Adivasi Vikas Vibhag Bharti esakal
पुणे

Government Job : आदिवासी विकास विभागाच्या नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती; 'इतक्या' जागांवर होणार होती भरती

राज्य सरकारने आज ही जाहिरात रद्द केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

या नोकरभरतीसाठीची जाहिरात रद्द करून, पुन्हा सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे राज्याच्या आदिवासी विभाग विभागाने कळविले आहे.

पुणे : आदिवासी विकास विभागातील गट ‘क’मधील विविध ६०२ रिक्त पदे (Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti) भरण्यासाठी गेल्या वर्षी सुरु केलेल्या भरती प्रक्रियेस राज्य सरकारने गुरुवारी (ता. २७) स्थगिती दिली. या नोकरभरतीसाठी याआधी प्रसिद्ध केलेली जाहिरात रद्द करण्यात आली असून, यासाठी पुन्हा नव्याने सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याच्या आदिवासी विकास विभागातील (Tribal Development Department) विविध रिक्त पदे भरण्यासाठी गेल्या वर्षी म्हणजेच, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या संवर्गाचा समावेश केलेला नसल्याचे कारण देत, राज्य सरकारने आज ही जाहिरात रद्द केली आहे. शिवाय याच भरतीसाठीची सुधारित जाहिरात ही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या संवर्गाचा समावेश करून, पुन्हा प्रसिद्घ केली जाणार आहे.

या नोकरभरतीसाठीची जाहिरात रद्द करून, पुन्हा सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे राज्याच्या आदिवासी विभाग विभागाने कळविले आहे. त्यामुळे ही नोकर भरती स्थगित करण्यात येत असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे ही जाहिरात रद्द करण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग संवर्गाचा या जाहिरातीत समावेश करून आणि पुन्हा बिंदूनामावली अद्ययावत करून ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने दिलेला आहे. सरकारच्या या आदेशानुसार आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुन्हा बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे गुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT