बारामतीत एक डिसेंबरपासून वयोश्री योजनेचे पूर्वतपासणी शिबीर sakal
पुणे

बारामतीत एक डिसेंबरपासून वयोश्री योजनेचे पूर्वतपासणी शिबीर

सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत ही तपासणी केली जाणार आहे.

मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

पुणे (बारामती) : राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रीम अवयव व मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. या साठी पूर्व तपासणी शिबीराचे बारामती एमआयडीसीतील शासकीय महिला रुग्णालय येथे 1 ते 4 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत ही तपासणी केली जाणार आहे.

केंद्राचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, पुणे जिल्हा परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, अपंग हक्क विकास मंच, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृत्रीम अवयव व मोफत सहायक साधनांचे वाटप केले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी पूर्वतपासणी शिबीराला येऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे

• आधारकार्ड

• रेशन कार्ड

• तहसिलदार, तलाठी किंवा नगरसेवकांनी दिलेला उत्पनाचा दाखला

• दोन पासपोर्ट साईजचे फोटो

आवश्यक पात्रता

• साठ वर्षांहून अधिक वय असावे

• वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजारांपेक्षा कमी असावे.

महत्वाची टीप...

• तपासणीनंतर एका व्यक्तीस एकाहून अधिक साधनेही मिळू शकतात

• अपेक्षित लाभार्थ्याने लागणा-या साहित्यांची पूर्व नोंदणी नजिकच्या सी.एस.सी. सेंटरमध्ये करावी.

• या सेंटरमध्ये मिळालेला रजिस्टर्ड नंबर स्वताःकडे ठेवावा व ग्रामसेवकासही द्यावा.

• अधिक माहितीसाठी 8007182510 किंवा 020- 24263266 व 24264253

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT