Students_Online_Exam 
पुणे

'आम्हाला काय दोष देताय'; पुणे विद्यापीठाच्या खुलाशावर विद्यार्थी-प्राध्यापक संतापले!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षेतील अव्यवस्थेबाबत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना जबाबदार धरू नये. परीक्षेचे व्यवस्थित नियोजन केले नसल्याने आणि संबंधित एजन्सीची एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्याची क्षमता नसल्याने हा गोंधळ झाला आहे, अशा शब्दात प्राध्यापक संघटनांनी नाराजी व्यक्त करत या कंपनीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणींसंदर्भात पुणे विद्यापीठाने सविस्तर खुलासा करून त्यांचे म्हणणे मांडले आहे. याबाबत 'सकाळ'ने प्राध्यापक, विद्यार्थी, अधिसभा सदस्यांची भूमिका जाणून घेतली.

''या नव्या पद्धतीच्या परीक्षेत फक्त प्रश्‍नसंच काढण्यापुरतीच प्राध्यापकांची जबाबदारी होती. त्यांनी पेपर जमा केल्यानंतर विद्यापीठाने यांची तपासणी करणे तज्ज्ञांचे काम होते. ते न करता थेट प्रश्‍नसंच अपलोड केल्याने परीक्षेत अनेक चुका दिसून आल्या. कोणतीही परीक्षा नव्या पद्धतीने घेताना त्याची चाचपणी केली जाते, पण सॉफ्टवेअरची क्षमता नसताना थेट परीक्षा घेतली गेली. त्यामुळे नियोजन अभावी गोंधळ झाला आहे, त्याचा दोष प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना देणे योग्य नाही.''
- सोपान राठोड , अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ.

''या परीक्षेत तंत्रज्ञानाचा वापर होणार होता, तर मग संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी आपल्या शाखेत कितीजण तंत्रज्ञान शिक्षित आहेत याची माहिती घेणे गरजेचे होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील प्राध्यापक, विद्यार्थी टेक्‍नोसेव्ही असून देखील तेथेही मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. प्राध्यापकांना मिळालेल्या अल्प वेळात नव्या पद्धतीचे प्रश्‍नसंच दिले, त्यातील दुरुस्ती तज्ज्ञांनी करणे गरजेचे होते. एजन्सी नियुक्त करण्यासही उशीर झाला, त्यामुळे परीक्षेत भाषा, विषय बरोबर न दिसणे, लॉगइन न होणे अशा समस्या येत आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्याची सर्वांची सामुहिक जबाबदारी असताना केवळ एका घटकाला जबाबदार धरणे योग्य नाही.''
- के. एल. गिरमकर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पुफ्टो)

''विद्यार्थ्यांना परीक्षेत तीन तास लॉगइन होत नव्हते, पेपर सबमीट होत नव्हता. यामध्ये त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्याची संबंधित कंपनीचीच क्षमता नाही. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनाही घरी जाण्यास पहाटे तीन वाजत आहेत. त्यामुळे कंपनीच्या कामाची चौकशी विद्यापीठाने चौकशी केली पाहिजे.''
- संतोष ढोरे, अधिसभा सदस्य

''पुणे विद्यापीठाने त्यांच्या नाकर्तेपणाच खापर विद्यार्थ्यांवर फोडणे कितपत योग्य आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नियोजन विद्यापीठाला जमलेले नाही ही चूक त्यांनी कबूल करावी. उर्वरित दिवसात तरी परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे नियोजन करावे.''
- वैभव एडके, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन

''विद्यापीठाची वेबसाइट हॅंग होत असेल, तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष? सराव परीक्षेसाठी अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्‍न असते तर ती दिली असती. तसेच परीक्षा देणारे विद्यार्थी हे शाळेतील नाहीत, तर पदवीचे असल्याने त्यांना तंत्रज्ञान वापराची माहिती आहे.''
- दत्ता साठे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT