esakal | रोहित पवार यांनी पाळला शब्द; नुकसानग्रस्त पाचशे कुटुंबांना मदतीचा हात
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित पवार यांनी पाळला शब्द; नुकसानग्रस्त पाचशे कुटुंबांना मदतीचा हात

शिर्सुफळ, पारवडी, सिध्देश्वर निंबोडी या गावातील जवळपास पाचशे कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचे किट पोहच केले.

रोहित पवार यांनी पाळला शब्द; नुकसानग्रस्त पाचशे कुटुंबांना मदतीचा हात

sakal_logo
By
संतोष आटोळे

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करीत आमदार रोहित पवार यांनी शिर्सुफळ-गुणवडी जिल्हा परिषद मतदार संघातील नुकसानग्रस्तांना संसारपयोगी साहित्याचे किट देत मदतीचा हात दिला. तसेच संपूर्ण निवाऱ्याचे नुकसान झालेल्या दोन कुटुंबाला घर उभा करुन देण्याच्या कामासही प्रारंभ केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जरी कर्जत-जामखेड मतदार संघातून आमदार झाले असले तरी आपल्या राजकारणाची सुरवात झालेल्या शिर्सुफळ- गुणवडी जिल्हा परिषद गटाला न विसरता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्य भागाला रोहित पवार यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्ताची व्यथा ऐकून व्यथित झालेल्या पवार यांनी तात्काळ मदतीची घोषणा करीत शासकिय यंत्रणेची वाट पाहत न बसता शिर्सुफळ, पारवडी, सिध्देश्वर निंबोडी या गावातील जवळपास पाचशे कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचे किट पोहच केले. यामुळे नुकसान ग्रस्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिध्देश्वर निंबोडी येथे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, ॲग्रोचे प्रकाश जठार व यांच्या हस्ते तर शिर्सुफळ येथे सरपंच आप्पासाहेब आटोळे, अॅग्रोचे राजाराम सकुंडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संसार उघड्यावर पडलेल्या मिळणार निवारा...सिध्देश्वर निंबोडी येथील संतोष कांबळे व सुतार या दोन्ही कुटुंबाचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. संपूर्ण घरी घरच वाहून गेले. यामुळे संसार उघड्यावर पडला. यावर रोहित पवार यांनी त्यांची भेट घेवून तात्काळ निवारा देण्याचे आश्वासन दिले होते. यापार्श्वभूमिवर बारामती अॅग्राेच्या संबधित यंत्रणेने कुटुंबाची भेट घेत घरासाठी लागणारे पत्रे व इतर साहित्य देण्याचे नियोजन केले आहे. यामुळे दोन्ही कुटंबाना निवारा मिळणार आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)