मातंग समाज sakal
पुणे

मातंग समाजावरील अन्यायाच्या विरोधात निदर्शने

सोलापूर जिल्ह्यात स्मशानभूमीत मृताच्या अंत्यविधीस परवानगी नाकारल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव (ता.माळशिरस) येथील साठे कुटुंबीयांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने बुधवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

बोरगाव (ता.माळशिरस) येथील स्मशानभूमीत मातंग समाजातील कुटुंबाला मृत व्यक्तीच्या अंत्यविधीस परवानगी दिली नाही. या घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. शहर आणि जिल्ह्यातील मातंग समाजासह विविध संघटनांच्या वतीनेही या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेस दोन आठवडे उलटूनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी. पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले. पीडित कुटुंबातील दशरथ साठे या वेळी उपस्थित होते.

या आंदोलनात नगरसेवक सुभाष जगताप, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे अनिल हातागळे, राजाभाऊ धडे, विनोद शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे शंकर तडाखे, दलित युवक आंदोलनाचे सचिन बगाडे, ॲड. राजश्री अडसूळ, रवी पाटोळे, मातंग एकता आंदोलनाचे विठ्ठल थोरात, महेश सकट, संजय केंदले यांच्यासह शहरातील इतर राजकीय पक्ष, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT