esakal | शिवाजी सावंत हे युगंधर साहित्यिक : प्रा. जोशी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

शिवाजी सावंत हे युगंधर साहित्यिक : प्रा. जोशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘जो काळ लेखकाने आणि वाचकाने पाहिलेला आणि अनुभवलेला नाही, पण जो पूर्वसुरींच्या अभिजात साहित्यकृतीतून आणि इतिहासाच्या पानापानातून धुक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे, तो विश्वसनीयरीत्या वाचकांसमोर उभा करणे हे मोठे आव्हान असते. ते शिवाजी सावंत यांनी समर्थपणे पेलले म्हणूनच ते ‘युगंधर साहित्यिक’ आहेत,’’ असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. (Pune News)

हेही वाचा: व्हायरल तापाचा हाहाकार; योगी आदित्यनाथ भेटलेल्या मुलीचा मृत्यू

सावंत यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्यावतीने ‘मृत्युंजय’ या कादंबरीच्या तिसाव्या आवृत्तीचे आणि ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या कादंबऱ्यांच्या डीलक्स आवृत्तीचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कॉन्टिनेन्टलच्या अमृता कुळकर्णी, कार्यवाह उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, सतीश देसाई, लक्ष्मण राठिवडेकर आदी या वेळी उपस्थित होते.

loading image
go to top