Corona-Patients 
पुणे

पुण्यात नव्या रुग्णांची संख्या घटली; तर कोरोनामुक्तांची संख्या वाढली!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या शंभरीच्या आत येऊन बुधवारी (ता.१३) दिवसभरात नवे 87 रुग्ण सापडले आहेत. तर दुसरी आनंदी बाब म्हणजे, कोरोनामुक्तांचा आकडा पुन्हा वाढला असून दिवसभरात 168 जण बरे झाल्याने आतापर्यंत सुमारे 1377 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरातील एकूण रुग्ण संख्या 2 हजार 824 इतकी नोंदविली गेली असली तरी त्यातील 1 हजार 284 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
दरम्यान, नवे रुग्ण कमी झाले; कोरोनामुक्तांची संख्या वाढली तरी, 115 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील 32 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातही रुग्ण हे 40 आणि 60 वर्षापेक्षा अधिक वयाची आहेत. या सर्व रुग्णांना कोरोनासह अन्यही आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. येरवड्यातील 65 वर्षांच्या महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. याच भागातील 64 वर्षांच्या पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. त्यांना न्युमोनिया झाल्याचे दिसून आले आहे.

ताडीवाला रस्ता परिसरातील 42 वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने सहा मेला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. बिबवेवाडीतील 75 वर्षांच्या महिलेला 9 मेला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर बुधवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. अन्य तीन मृत व्यक्तींवरही उपचार सुरू होते. 

पुणे शहरात आतापर्यंत सुमारे 25 हजार 953 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 2 हजार 884 जणांना कोरोना झाला आहे. सध्या तपासणीचा वेग वाढविण्यात आलो असून, गेली काही दिवस रोज साधारणपणे 1 हजारा पेक्षा अधिक जणांची तपासणी होत आहे. 

तीन दिवसांपूर्वी 1600 जणांचे "स्वॅब' घेण्यात आले. मात्र, तेवढ्या नागरिकांचा अहवाल आला नाही. दरम्यान, बुधवारी 1200 नागरिकांची तपासणी झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT