पुणे

पुणे : भाजप नगरसेविकेच्या पतीची एकाला मारहाण; तक्रार दाखल

सागर आव्हाड

पुणे : पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका असलेल्या अर्चना मुसळे यांचा पतीने आणि भावाने एका रहिवाशाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अर्चना मुसळे या भारतीय जनता पक्षाच्या औंध प्रभागातील नगरसेविका आहेत. औंध परिसरातीलच क्लोरियन पार्क या इमारतीत त्या वास्तव्यास आहेत. मारहाण करण्यात आलेली व्यक्ती देखील याच इमारतीत राहते. संबंधित व्यक्तीने मुसळे यांच्या विरोधात बदनामी करणारी पत्रके वाटली असल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT