पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये झोपडपट्ट्यांत लस घेण्याचे प्रमाण कमी

पुणे आणि मुंबईमध्ये एकूण सात संस्थांनी सर्वेक्षण केले. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये आकांक्षा फाउंडेशन, टिच फॉर इंडिया आणि आय टिच स्कूल्स या संस्थांचा सहभाग होता.
Corona Vaccination
Corona VaccinationSakal

पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये (Slum) राहणाऱ्या नागरिकांमध्ये लसीकरणाचे (Vaccination) प्रमाण कमी आहे, यामागच्या कारणाचा शोध घेतला असता, तब्बल ५१ टक्के नागरिकांना लसीकरणामुळे आरोग्याला (Health) धोका निर्माण होईल अशी भीती आहे. तर लसीकरणाबाबत चुकीची व अर्धवट माहिती मिळाल्याने ३० टक्के नागरिक लसीकरणापासून लांब राहात असल्याची चिंताजनक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे पुणे महापालिकेने झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे स्वागत होत असले तरी या भागात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. (Pune Pimpri Chinchwad Rate of Vaccination in Slums is Low)

पुणे आणि मुंबईमध्ये एकूण सात संस्थांनी सर्वेक्षण केले. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये आकांक्षा फाउंडेशन, टिच फॉर इंडिया आणि आय टिच स्कूल्स या संस्थांचा सहभाग होता. यामध्ये १८ ते पुढील वयोगटाचे १ हजार ३०० नागरिकांचा समावेश होता. लसीकरण करण्यास का टाळाटाळ केली जात आहे याचे कारण विचारण्यात आले. त्यामध्ये प्रमुख पाच कारणे आढळून आली. लसीकरणामुळे आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो, लसीकरणाबद्दल अपूर्ण माहिती, सशुल्क लसीकरण परवडत नाही, लस उपलब्ध नसल्याने लस घेतली नाही आणि माझी तब्येत उत्तम आहे, लसीची गरज नाही हे कारण सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

Corona Vaccination
अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; अधिसूचना जाहीर

उपाययोजना

  • लसीकरणाबाबत जनजागृती

  • लस व लसीकरण केंद्रांची उपलब्धता वाढविणे

  • स्थानिक लोकप्रतिनिधी, मंडळ, संस्था, डॉक्टर आदींच्या मदतीने लसीकरणाबाद्दल जागृती करणे

  • घरातील वृद्धांना व महिलांना प्रोत्साहन देणे

  • माध्यमे, सोशल मीडिया सेलिब्रिटींकडून आवाहन करणे

या भागात झाले सर्वेक्षण

पेठ भाग, कोथरूड, मुंढवा, येरवडा, हडपसर, आकुर्डी, औंध, कोंढवा, सोमवार पेठ, भवानी पेठ, गंज पेठ, कोरेगाव पार्क, बोपोडी, कासारवाडी, केळेवाडी, पिंपरी, मोशी आणि बोपखेल या भागात सर्वेक्षण करण्यात आले आहे.

आव्हाने

  • वैयक्तिक पातळीवर

  • लसीकरणावर अविश्‍वास

  • लस साइड इफेक्टची चिंता

  • रुग्णालयात जायची भीती

  • लशीचा फायदा होत नाही, असा गैरसमज

  • कोरोना हे जागतिक षड्‌यंत्र असल्याचे गैरसमज

  • अल्पसंख्याक समाजामध्ये गैरसमज

सामूहिक पातळीवर

  • घरातील ज्येष्ठांना लशीसाठी परावृत्त केले जात आहे

  • निर्णय घेण्याचा अधिकार महिलांना नाही

अडथळे

  • केंद्र व लशीची कमतरता

  • खासगी केंद्रांवरील महाग लसीकरण

  • अंतर जास्त असणे

  • लसीकरण प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ

  • ऑनलाइन नोंदणीबाबत अपूर्ण माहिती

झोपडपट्टी भागातील नागरिकांचे लसीकरण कमी असल्याने त्याचा अभ्यास सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन केला. त्यामध्ये लसीकरणाबाबतची भीती आणि अपूर्ण माहिती यामुळे लसीकरण केले जात नाही. कोरोनाच्या विरोधात लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती आवश्‍यक आहे.

- शीतल मुरुडकर, वरिष्ठ संचालक स्कूल, आकांक्षा फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com