sakal
पुणे

पुणे: भूस्खलन रोखण्यासाठी समितीचे गठण

अतिवृष्टीमुळे होणारे भूस्खलन आणि दरडींच्या दुर्घटना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने तज्ज्ञ समितीची गठण करण्यात आले आहे.

सम्राट कदम -सकाळ वृत्तसेवा

पुणे: अतिवृष्टीमुळे होणारे भूस्खलन आणि दरडींच्या दुर्घटना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने तज्ज्ञ समितीची गठण करण्यात आले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे प्राध्यापक डॉ. रवि सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांची समितीची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून दरड कोसळणे आणि भुस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रायगड, कोल्हापूर आणि घाटमाथ्यावरील भागात पावसाळ्यात अशा दुर्घटनांमुळे जीवित हानीही होत आहे. अशा आपत्तीच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी, तसेच आपत्ती प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे.

यामध्ये प्रभाकर देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भू-शास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. सतीश ठिगळे, भूगर्भशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. भावना उंबरीकर, सिंबायोसिसचे प्राध्यापक डॉ. टी.पी.सींग, डॉ. अभिजित खांडगे, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे प्रतिनिधी, पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भूजल सर्वेक्षण व विकास संस्थेचे प्रतिनिधी आदींचा समावेश आहे.

"समितीची नुकतीच अधिकृत घोषणा झाली असून, बैठकीनंतर समितीची पुढील कार्यवाही निश्चित होईल. भूस्खलनाबरोबरच कोकण आणि सह्याद्रीतील वातावरणीय बदलाचा अभ्यासावरही आमचा भर असेल."- डॉ. सतीश ठिगळे, भू-शास्त्रज्ञ, समितीचे सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT