Indian Idol Marathi sakal
पुणे

इंडियन आयडल मराठीच्या ग्रँड प्रीमियरमध्ये पुण्याच्या स्पर्धकांची बाजी

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके असलेल्या अजय-अतुल यांनी उत्तमोत्तम गायकांची निवड केली

अरुण सुर्वे

पुणे : सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अल्पावधीतच आपलंस केलं. पहिल्यांदाच इंडियन आयडल हा कार्यक्रम प्रादेशिक भाषेमध्ये होत असून तो मराठीमध्ये होत आहे . 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. अजय-अतुल सारखे परीक्षक असल्याने कार्यक्रमाला अजूनच रंगत चढली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके असलेल्या अजय-अतुल यांनी उत्तमोत्तम गायकांची निवड केली आहे. ऑडिशन राउंडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी हजेरी लावली होती. कोणाची निवड करायची, हे ठरवणं परीक्षक अजय-अतुल आणि बेला शेंडे ह्यांच्यासाठी अवघड होतं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर करत आहे .

थिएटर राउंडमध्ये उत्तम १२ स्पर्धकांची निवड होणार होती, पण उत्तम स्पर्धक ठरवणं अवघड असल्यानं अजून २ स्पर्धकांची निवड करून महाराष्ट्राच्या मातीतून आलेल्या उत्तम कलाकारांची टॉप १४ मध्ये निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने पुण्यातील अश्विनी मिठे, चैतन्य देवढे, शुभम खंडाळकर आणि अमोल सकट यांची निवड करण्यात आली. या सुरांच्या प्रवासाला लिखाणाचीही साथ लाभत आहे. लेखक वैभव जोशी या कार्यक्रमाचं लिखाण करत आहे. या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी अजित परब देखील आहेत. कोणतं गाणं म्हणायचं, ते कसं गायचं ह्या सगळ्यात म्युझिशियनच्या मदतीने ते स्पर्धकांना मदत करत आहेत.

या शोबद्दल अजय-अतुल म्हणाले, इंडियन आयडलसारखा हा देशविदेशात गाजलेला तसेच हिंदी भाषेतील लोकप्रिय शो मराठीसारख्या मोठ्या प्रादेशिक भाषेत आला आहे याचा आम्हाला आनंद होत आहे .या कार्यक्रमाची खूप क्रेझ असल्यामुळे हा शो नक्कीच गाजणार आहे . ७००० स्पर्धकांमधून टॉप १४ स्पर्धक निवडणे आमच्यासाठी खूप कठीण होते. त्यातूनही टॉप १२ च स्पर्धक निवडायचे होते; परंतु आम्ही सोनी मराठी वहिनीला विनंती करून टॉप १४ स्पर्धक निवडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT