राज्य कसे चालवायचे? अजित पवार यांचा आंदोलनकर्त्यांना सवाल

राजहंस सहकार संकूलच्या नुतनिकरण इमारतीचे उद्धाटन प्रसंगी आज अजित पवार बोलत होते
अजित पवार
अजित पवारsakal

माळेगाव : महावितरण कंपनीची अर्थिक स्थिती डबघाईला आल्याने त्यांनी वीज भरणा होण्यासाठी राज्यात कठोर भूमिका घेतली आहे. वीज खंडीत झाल्याने अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहेत. तशीच स्थिती एसटी बसवाल्यांच्या बाबतीत आहे. विजेचा प्रश्न असो अथवा एसटी बसचा असो, सरकार संबंधित महामंडळांना सर्वतोपरी अर्थिक मदत करीत आहे आणि यापुढेही मदत करायला आम्ही शासनस्तरावर हात आकाडता घेणार नाही. परंतु काहीजण आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आडमूटपणाची भूमिका घेत जनतेला बेटीस धरत आहेत. सर्वांनीच असे केले तर सरकार कसे चालवायचे, असा सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दंड व्याज न भरता आता थकीत व नियमित बिले भरावीत असे सांगितले.

माळेगाव (ता.बारामती) येथील रणजित तावरे आदींनी नव्याने उभारलेल्या राजहंस सहकार संकूलच्या नुतनिकरण इमारतीचे उद्धाटन प्रसंगी आज अजित पवार बोलत होते. कार्य़क्रमाच्या अध्यक्षस्थानी माळेगाव साखर कारखान्याचे प्रमुख बाळासाहेब तावरे होते. दरम्यान, बारामतीसह सर्वत्र रस्ता रुंदीकरणासह अनेक सरकारी कामे वेगात सुरू आहेत. परंतु काहींनी पैसे उकळण्याचा धंदा लावला आहे, याकडे लक्ष वेधत श्री. पवार म्हणाले,`` केंद्र व राज्य सरकार आपल्या भागातील पालकी मार्ग, महामार्ग, राज्यमार्गाचे रुंदीकरण करीत आहे. संबंधित रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागेचा, घर, विहीरींना सरकार मोबदला सरकार देत आहे.

अजित पवार
IND vs NZ : टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा विजय;पाहा व्हिडिओ

अर्थात मोबदला मिळतो म्हणून अनेकांनी पालखी मार्गालगत आंबा, नारळाची झाडे लावून पैसे उकळण्याची माहिती पुढे आली आहे. अरे बाबांनो...सरकारकडे काय नोटा झापायचे मशीन नाही. सरकारला लुटू नका, शेवटी होणारी विकास कामे ही तुम्हा जनतेच्या भल्यासाठी होत आहेत. नीरा डावा कालव्याचे शहर अथवा गावाच्या ठिकाणी अस्तरीकरण करण्याचे नियोजन आहे. यापुढील काळात या कालव्याची पाणी वहनक्षमता दुप्पट करण्याच्या उद्देशाने जुने पुल पाडून नविन २४ प्रशस्त पुल उभारणीचे काम हाती घेतले आहे. हे काम पुर्णत्वाला आल्यानंतर शेतकऱ्यांना कमी कालावधीत पुरेसे पाणी शेती सिंचन, शेततळी, साठवण तलाव भरण्यासाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवकाळी पाऊस झाला, परंतु शेतकऱ्यांचे त्यामध्ये खूप नुकसान झाले. हे जरी खरे असले तरी धरण साठ्यातील चार टिमएमसी पाण्याची बचत झाली आहे. या प्राप्त स्थितीमुळे उन्हाळ्यामध्ये विशेषतः सिंचनासाठी पाणी कमी पडणार नाही.

`` तत्पुर्वी राजहंस सहकारी संकूलच्या स्थापनेपासून ते आजवरच्या कार्य़ाचा आढावा रणजित तावरे यांनी उपस्थितांपुढे मांडला. यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संभाजी होळकर, योगेश जगताप, विश्वास देवकाते, केशवराव जगताप, दत्तात्रेय येळे, मदनराव देवकाते, सुनिल पवार , निता फरांदे, रोहित कोकरे, विलास तावरे, धनवान वदक आदी उपस्थित होते. प्रस्ताविक रणजित तावरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी केले, तर आभार वसंतराव तावरे यांनी मानले.

राजहंस संकूल दिशादर्शक...

राज्यात सहकार क्षेत्रामुळे खरेतर शेती आणि शेतीपुरक व्यवसाय चांगल्यापद्धतीने विकसित झाला. सहाजिकच शेतकऱ्यांचे राहणिमान उंचविण्यासाठी त्याचा फायदा झाला. त्याच तत्वाने खरेतर बाळासाहेब तावरे यांनी माळेगावात राजहंस सहकार संकूलची उभारणी केली होती. त्या संकुलाचा आज वटवृक्ष झाला आहे. निश्चितपणे या संकूलचे कार्य़ इतर सहकारी संस्थांना दिशादर्शक ठरत आहे, असे गौरोद्धागर अजित पवार यांनी काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com