court 
पुणे

परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोंबड्या चोरून नेल्याच्या गैरसमजातून सत्तूर आणि कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने डोक्‍यात आणि खांद्यावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विद्यार्थ्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीची परीक्षा असल्याने तसेच या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे कोणताही पुरावा न सापडल्याने त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.पी. अदोने यांनी हा आदेश दिला. रजत हिरामण दगडे (वय २० रा. बावधन बुद्रूक) असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. ऋषीकेश सुभेदार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. रजत याचे नातेवाईक गणेश ऊर्फ निमितीश दिलीप शेडगे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. विजय शिवाजी येनपुरे (वय ३९, रा. भूगाव, ता. मुळशी) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. ही घटना २९ डिसेंबर २०२० रोजी भूगाव येथे घडली होती.

वाद सोडविण्यासाठी गेलेल्या अश्‍वजीत पवळ आणि सूरज शेडगे यांनाही मारहाण करण्यात आली आहे. शेडगे याच्या गोठ्यातून कोंबड्या चोरून नेल्याच्या गैरसमजातून ही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात दगडे याने जामिनासाठी अर्ज केला होता. माझी परीक्षा आहे. तसेच वादात सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा न सापडल्याने जमीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली होती.

आरोपी हा शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवले, तर शिक्षण आणि आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल करण्याची औपचारिकता बाकी आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT