Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anna_BJP

आज अण्णा हजारेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहेत.

Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य

पुणे : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उपोषण आंदोलनाचं अस्त्र बाहेर काढले होते. २९ जानेवारीपासून ते उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. पण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी अण्णांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त केलं. 

त्यानंतर आज अण्णा हजारेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याबरोबर अण्णांचा फोटो सध्या सोशल मीडियात फिरत आहे. अण्णांनी भाजपमध्ये खरंच प्रवेश केला आहे का? का त्यांना भाजपकडून ऑफर आहे? असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. 

नवज्योतसिंग सिद्धूची पुन्हा 'ठोको ताली'!​

@iAnnaHaare या ट्विटर हँडलवरून अण्णा आणि नड्डा यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. अण्णा हजारेंनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या ट्विटला दीड हजारहून अधिक नेटकऱ्यांनी रिट्विट केलं असून साडेसात हजाराहून अधिकांनी पसंती दर्शविली आहे. ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही सोशल मीडियात हा फोटो प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. 

Indo-China Border: राफेलमुळं चीनच्या कॅम्पमध्ये खळबळ!​

फॅक्ट चेक
या फोटोवर नजर टाकल्यास तो मॉर्फ केला असल्याचे दिसून येईल. अण्णांचा चेहरा दुसऱ्या एक व्यक्तीच्या चेहऱ्याच्याजागी एडिट करून बसवण्यात आला आहे. अल्ट न्यूजने याबाबतचा मूळ फोटो शोधून काढला आहे. २५ जून २०२० रोजी नवभारत टाईम्सने एका बातमीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक फोटो वापरला होता. त्या फोटोचं एडिटिंग करण्यात आलं आहे. 

प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील कारचा अपघात, 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या​

ज्योतिरादित्य सिंधिया ११ मार्च २०२० रोजी भाजपमध्ये दाखल झाले होते. त्याआधी दोन दिवस म्हणजे ९ मार्च २०२० रोजी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. 

एडिटवेळी वापरण्यात आलेला अण्णांचा फोटो हा एप्रिल २०११ मधील आहे. अनेक माध्यमसंस्था अण्णांचा हा फोटो कायम वापरत आहेत. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)