crime muder case sakal
पुणे

Pune Crime : हाताची नस कापून बाकड्यावर बसली अन्.. अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलीने केली प्रियकराची हत्या

रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ती त्याच्या खाजगी वसतिगृहातील खोलीत अभ्यासासाठी गेली. ते एका बेडरूम मध्ये होते. तर खोलीतील बाकी विद्यार्थी दुसऱ्या बेडरूम मध्ये होते.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने वर्गमित्र असलेल्या मित्राचा त्याच्या खाजगी वसतिगृहातील खोलीत चाकूने भोसकून खून केल्याची घटना वाघोलीत रायसोनी कॉलेज रोडवर सोमवारी पहाटे घडली. प्रेम प्रकरणातून हा खून झाला आहे. खुनानंतर तिनेही स्वतःची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात ही धक्कादायक घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रही हादरले आहे.

यशवंत अशोक मुंढे ( वय 22, सध्या रा.वाघोली, मूळ, रा. लातूर ) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे तर अनुजा महेश पनाळे (वय 21, सध्या रा वाघोली, मूळ रा अहमदनगर ) असे खून केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दोघेही रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अनुजा व यशवंत मध्ये प्रेम संबंध होते. तो सारखा तिच्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात भांडणे व्हायची.

तो तिला अनेक बंधने घालत होता. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ती त्याच्या खाजगी वसतिगृहातील खोलीत अभ्यासासाठी गेली. ते एका बेडरूम मध्ये होते. तर खोलीतील बाकी विद्यार्थी दुसऱ्या बेडरूम मध्ये होते. मध्यरात्री त्यांचे पुन्हा भांडण झाले. अनुजा हिने चाकूने यशवंतच्या छातीवर व पोटावर वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

हल्ला केल्यानंतर ती खाली पळून आली. तिने हाताची नस कापून ती इमारती समोरील खाऊ गल्लीच्या बाकड्यावर बसली. तेथून जाणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांनी तिची अवस्था पाहून पोलिसांना 100 नंबर वर कळविले व तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांना खुनाची घटना कळाली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार करीत आहेत.

आम्हाला माहिती नाही

खाजगी वसतिगृहाची ही इमारत स्थानिक व्यक्तीच्या मालकीची आहे. ती दिल्ली येथील डीट्वेलय स्पेसेस प्रा ली या कंपनीने भाडे तत्वावर घेतली आहे. किंगस्टन हाऊस.असे नाव देण्यात आले आहे. मुलांचे हे वसतिगृह आहे. एका खोलीत चार ते पाच विद्यार्थी राहतात. प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा आहे. तेथेही सुरक्षा रक्षक तैनात असतो. तरीही अनुजा हिने रात्रीच प्रवेश करून वर्ग मित्राचा खून केला. येथील सुरक्षा रक्षक व डीट्वेलय स्पेसेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

अनुजा धोक्याच्या बाहेर

अनुजा हिला त्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तिने स्वतःची नस कापल्याने रक्तश्राव झाला होता. यामुळे तिला भोवळ येत होती. तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. ती धोक्याच्या बाहेर असून दुपारी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले.

खाजगी वसतीगृहाचा सुळसुळाट

वसतिगृह बांधून भरपूर पैसा मिळत असल्याने सध्या खाजगी वसतीगृहांचा सुळसुळाट झाला आहे. तिथे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह असतो. कोणतेही बंधन वसतिगृह प्रवेशाबाबत दिसून येत नाही. अनेक इमारतीही अनाधिकृत आहेत. यावर काही तरी नियंत्रण हवे.वाघोलीत डीट्वेलय स्पेसेस प्रा ली या कंपनीच्या किंगस्टन हाऊस या इमारतीत ही खुनाची घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT