Pune Dam :  Sakal
पुणे

Pune Dam : भामा आसखेड धरणात ८२ टक्के पाणीसाठा; धरण परिसरात येताना पर्यटकांनी काळजी घ्यावी

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे.

सकाळ वृत्तसेवा

आंबेठाण - खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात ८२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा ६.७५ टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा ६.२८ टीएमसी इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ९३.४० टक्के पाणीसाठा जमा झाला होता. तालुक्यातील चासकमान धरणाच्या तुलनेत या वर्षी भामा आसखेड धरणात पाणी साठा खूपच कमी आहे.

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले

मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जूनपासून ४८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सध्या धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे, तरीही शिवे, वहागाव, देशमुखवाडी, आंबोली, वांद्रा, कोळीये, आंभू, पाईट, पाळू, वाघू, तोरणे, आहिरे आदी

भागातून धरणात पाणीसाठा जमा होत आहे.

धरण परिसरात येताना पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक अभियंता (श्रेणी १) आश्विन पवार, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT