Mumbai Police : मुंबईत घातपाताची धमकी; धमकी देणारा पाँडिचेरीतून अटकेत

धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.
Mumbai Police
Mumbai PoliceSakal

मुंबई - मुंबई आणि दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी 19 वर्षीय आरोपी तरूणाला पाँडीचेरीतून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या कृत्यामागे नेमके कारण काय होते याचा तपास पोलीस करत आहेत.

मुंबई पोलीसंच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी दुपारी बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. कंट्रोल रुमला फोन करत विमानतळ परिसरात बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडणार असल्याची माहिती आरोपीने दिली होती.

Mumbai Police
Mumbai Local : पावसाची उसंत, तरीही लोकल सेवा विलंबाने!

यानंतर या दोन्ही विमानतळावर शोध घेतला असता काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.दरम्यान यानंतर मुंबई पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कलम 506(2) आणि कलम 505(1) अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहार पोलिसांनी सर्व प्रथम फोन करणाऱ्याच्या फोन क्रमांकाचा तपास सुरू केला. आरोपीचे लोकेशन पोलिसांना पाँडिचेरी येथे सापडले.

तत्काळ सहार पोलिसांनी आपले एक पथक पाँडिचेरीला रवाना केले. पाँडिचेरीला पोहोचून आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने कृत्य करण्याच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत.

Mumbai Police
Mumbai Crime News : बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरला भावांनी संपवलं; डोक्यात हातोडा घातला अन्...

महिन्याभरात चौथ्यांदा धमकी

मुंबईत दहशतवादी कट रचण्याच्या धमकीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा धमक्या पोलिस नियंत्रण कक्षाला येत आहेत.गेल्या महिनाभरात ही चौथी धमकी आहे. 23 जुलै रोजी वाहतूक नियंत्रण कक्षालाही मुंबईत घातपाताची धमकी मिळाली होती.

धमकी देणाऱ्याने 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा मुंबईत घडवून आणला जाईल, असे म्हटले होते.

एवढेच नाही तर या मेसेजमध्ये एका अज्ञात व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांचे सरकार आणि यूपीमधील मोदी सरकार निशाण्यावर असल्याची धमकी दिली होती. काही ठिकाणी काडतुसे आणि एके 47 पोहोचल्याचेही सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com