Pune Crime Esakal
पुणे

Pune Crime: पुणे शहरातील धक्कादायक घटना! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत माजी नगरसेविकेवर अत्याचार

Shocking incident in Pune city: या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करत असतानाच दुसरीकडे मात्र, खळबळजनक घटना समोर येत आहे. मैत्री संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात माजी नगरसेविकेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपूर्ण संबंध होते. याच मैत्रीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने अत्याचार केला आहे.

त्याचबरोबर, तुझ्या पतीला फोटो दाखवेन, अशी धमकी देत आरोपीने पीडित नगरसेविकेवर वारंवार अत्याचार केला. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून १० लाख रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे.

दरम्यान, आरोपीकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून पीडित नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT