Honey Trap : डॉ. प्रदीप कुरुलकरची पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर चाचणी करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

दहशतवाद विरोधी पथकाने केली होती मागणी
प्रदीप कुरूलकर
प्रदीप कुरूलकर sakal

पुणे - पाकिस्तानी हेराला देशाची गोपनीय माहिती पाठविल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर ॲण्ड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर चाचणी घेण्याची दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी हा आदेश दिला. या अर्जावर यापूर्वीच सुनावणी झाली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी (ता. १६) निकाल दिला. डॉ. कुरुलकरकडून तपासास अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्याची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली.

त्यासाठीचा अर्ज एटीएसने न्यायालयात सादर केला होता. त्यावर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना व्हाइस लेअर ॲनॅलिसिस चाचणी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का, अशी विचारणा एटीएसच्या अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, एटीएसच्या अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देता आली नाही.

प्रदीप कुरूलकर
Pune Accident : जांभूळवाडी दरीपुलाजवळ अपघात,महामार्गावरील वाहतुक विस्कळीत

त्यामुळे न्यायालयाने चाचणीबाबत सुनावणी घेण्यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. दरम्यान, डॉ. कुरुलकरने या दोन्ही चाचण्या करण्यास नकार दिला होता.

प्रदीप कुरूलकर
Pune News : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे गुजरातमध्ये उपकेंद्र करणार - महासंचालक संभाजी कडू-पाटील

पॉलिग्राफ चाचणीसाठी आरोपीची परवानगी आवश्यक असते. मात्र व्हाइस लेयर चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची नसते. आरोपी तपासास सहकार्य करीत नाही. त्यामुळे न्यायालयाने व्हाइस लेयर चाचणीसाठी परवानगी द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला होता.

प्रदीप कुरूलकर
Navi Mumbai Crime News : एका तासात दोन महिलांचे १ लाख ३५ हजाराचे दागिने लुबाडले !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com