gaesh mandal  sakal
पुणे

Pune Ganeshotsav : बाईपण भारी देवा' जनवाडी सार्वजनिक मंडळाचा देखावा

यंदा स्थानिक मुलांकडून पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवणे हा उपक्रम मंडळांनी घेतला.

समाधान काटे

पुणे - अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुलगे आणि मुलींमध्ये दुजाभाव नको असा संदेश देणारा ‘बाईपण भारी देवा‌’ हा जिवंत देखावा सादर केला आहे.सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, द्रौपदी मर्मू, लता मंगेशकर, कल्पना चावला, किरण बेदी, डॉ. आनंदीबाई जोशी, सिंधुताई सपकाळ, सानिया मिर्झा, सुधा मूर्ती या महिलांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च यश संपादन केले. अशा कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख करून देत, मुलगे आणि मुली यांच्यामध्ये दुजाभाव करू नका असा संदेश जिवंत देखाव्यातून देण्यात आला आहे.

जनवाडी परिसरातील वस्ती विभागातील मुलींनी या देखाव्यात अभिनय केला आहे. या मुलींना सायकली भेट देण्यात येणार आहेत. किलबिल शाळा आणि जागृती सेवा संस्था तसेच व्याख्याते लक्ष्मण जाधव यांचे सहकार्य लाभले आहे.

जनवाडी गोखलेनगर परिसरातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असा मंडळाचा नावलौकिक आहे. मंडळ या वर्षी ६१ वे वर्ष साजरे करीत आहे. अंध, अपंग, तृतीय पंथी व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूंचे किट व साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, वारकऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था असे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा स्थानिक मुलांकडून पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवणे हा उपक्रम मंडळांनी घेतला. पानशेत पुरानंतर स्थापन झालेले परिसरातील हे पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे

नरेश कांबळे मंडळाचे अध्यक्ष असून उमेश वाघ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. विनोद सकट, अभिजीत धाडवे, अशोक खुडे, गौरव शिंदे, विवेक कांबळे, अमित घोलप, योगेश शिंगारे, गणेश कांबळे, विलास खराडे हे प्रमुख पदाधिकारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT