Attack Sakal
पुणे

खानापूर : चार-पाच जणांकडून तरुणावर कोयत्याने वार; आरोपी फरार

खानापूर (ता.हवेली) येथे एका तरुणावर चार ते पाच जणांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.

निलेश बोरुडे

किरकटवाडी: खानापूर (ता.हवेली) येथे एका तरुणावर चार ते पाच जणांनी कोयत्याने वार (Attack) केल्याची घटना घडली आहे. अक्षय शिंदे असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाच्या नात्यातील एक महिलाही झटापटीत जखमी झाली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Pune Crime News)

हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अक्षय शिंदे हा घरासमोर उभा असताना तेथेच आजुबाजुला राहणाऱ्या चार ते पाच तरुणांनी अचानक येऊन कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. जीव वाचविण्यासाठी अक्षय घरात पळाला असता आरोपींनी पाठलाग करुन हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत एक महिलाही किरकोळ जखमी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून हल्ला करुन फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT